rajkiyalive

SANGLI CRIME : समडोळीतील महिलेची ऑनलाईन नोकरीच्या आमिषाने 3 लाखाची फसवणूक

सांगली :

SANGLI CRIME : समडोळीतील महिलेची ऑनलाईन नोकरीच्या आमिषाने 3 लाखाची फसवणूक मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहणार्‍या एका महिलेला वर्क फ्रॉम होम मधून फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 3 लाख 25 हजरांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि दि. 27 डिसेंबर 2023 आणि दि. 05 जानेवारी 2024 या कालावधीत घडली. या प्रकरणी सौ. उजमा अनिस मुजावर (वय 20 रा. समडोळी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या चाहत रजपूत आणि शिरीन (दोघी रा. गुरगाव रा. हरियाणा) या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

SANGLI CRIME : समडोळीतील महिलेची ऑनलाईन नोकरीच्या आमिषाने 3 लाखाची फसवणूक

हरियाणातील दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सौ. उजमा मुजावर या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात. 12 डिसेंबर 2023 रोजी संशयित चाहत रजपूत आणि शिरीन या महिलेने तिच्या मोबाईलवरून मुजावर यांना फोन करून नोकरी डॉटकॉम द्वारे फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनी मध्ये वर्क फ्रॉम होम द्वारे नोकरी देतो असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, लॅपटॉप, डे स्टॉक, आयडी कार्ड, फ्लिपकार्ट किट व इतर वस्तू करिता सिक्युरिटी डिपॉझिट अशी वेगवेगळी कारणे सांगून मुजावर यांच्याकडून ऑनलाईन 3 लाख 25 हजार 280 रुपये घेतले.

यानंतर नोकरीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने त्यांनी चौकशीसाठी संशयित महिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित हरियाणाच्या दोन महिलांविरोधात गुन्हा दखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज