rajkiyalive

SANGLI CRIME : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडीत दोघांची फसवणूक : 15 लाख 12 हजारांना घातला गंडा.

 

सांगली :

SANGLI CRIME : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडीत दोघांची फसवणूक : 15 लाख 12 हजारांना घातला गंडा. : मिरज तालुक्यातील सावळवाडी आणि माळवाडी येथील दोन शेतकर्‍यांना ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून बीड आणि जत मधील दोघांनी तब्बल 15 लाख 12 हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सदर फसवणुकीचा प्रकार हा 2018 आणि 2022 या वर्षी घडला. या प्रकरणी अमोल कुमार जाधव (वय 36 रा. माळवाडी) आणि अमोल जगन्नाथ कोळी (रा. सावळवाडी) या दोघांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SANGLI CRIME : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडीत दोघांची फसवणूक : 15 लाख 12 हजारांना घातला गंडा.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या मयूर शिवाजी लोखंडे (वय 24 रा. बीड) आणि माळाप्पा अमिनाप्पा मांग (रा. अक्कळवाडी, जत) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमोल जाधव हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील माळवाडी या गावामध्ये राहत असून ते शेती करतात. संशयित मयूर लोखंडे याने सण 2018 आणि 2019 या वर्षासाठी नाय कोयते ऊस तोड मजूर पुरवतो असे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 7 लाख रुपये घेतले. सदरची रक्कम अमोल जाधव यांनी कारखान्यातून मिळालेला ऍडव्हान्स तसेच इतरांकडून घेऊन संशयित लोखंडे यास दिले होते.

पैसे घेऊनही संशयित लोखंडे याने ऊसतोडणी मजूर पुरवले नाहीत. याबाबत जाधव यांनी बीड जिल्ह्यातील ढोरगाव येथे संशयित लोखंडे याच्या घरी जाऊन त्याला मजूर पुरव अन्यथा घेतलेले पैसे परत कर असे सांगितले होते. मात्र, संशयित लोखंडे याने मजूर पुरवले नाहीत तसेच पैसे देखील परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दुसरीकडे अमोल कोळी यांनी एप्रिल 2022 मध्ये मुकादम माळाप्पा मांग याने ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून वेळोवेळी 9 लाख 12 हजार रूपये घेतले होते. परंतू ऊस हंगामात मुकादमाने मजूर पुरवले नाहीत. कोळी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही मुकादम नांग याने ऊसतोड मजूर पुरवले नाहीत आणि पैसेही परत दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांच्याही फिर्यादीवरून फसवणूक करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज