rajkiyalive

SANGLI CRIME : नांद्रेत जमीन खरेदीच्या बहाण्याने शिक्षिकेची 21 लाख 82 हजारांची फसवणूक : सांगलीतील चौघांवर गुन्हा दाखल.

सांगली :

SANGLI CRIME : नांद्रेत जमीन खरेदीच्या बहाण्याने शिक्षिकेची 21 लाख 82 हजारांची फसवणूक : सांगलीतील चौघांवर गुन्हा दाखल. शेतजमीन खरेदीच्या बहाण्याने पैसे घेऊन खरेदी न देता ती परस्पर दुसर्‍याला विकून शिक्षिकेची तब्बल 21 लाख 82 हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सदर फसवणुकीचा प्रकार हा दि. 05 ऑक्टोबर 2022 ते दि. 01 एप्रिल 2023 या कालावधीत नांद्रे येथे घडली.

SANGLI CRIME : नांद्रेत जमीन खरेदीच्या बहाण्याने शिक्षिकेची 21 लाख 82 हजारांची फसवणूक : सांगलीतील चौघांवर गुन्हा दाखल.

या प्रकरणी कमल सज्जन पाटील (वय 68 रा. लक्ष्मीनगर, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणुक करणार्‍या बाळासो मलगोंडा पाटील, अमोल बाळासो पाटील, अभय बाळासो पाटील आणि सौ. मनीषा महावीर चौगुले (सर्व रा. सांगली) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमल पाटील या निवृत्त शिक्षिका असून त्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगाव मध्ये राहतात. त्यांची ओळख सांगलीतील चौघा संशयितांसोबत झाली होती. दि. 05 ऑक्टोबर 2022 ते दि. 01 एप्रिल 2023 या कालावधीत संशयित चौघांनी नांद्रे येथील शेतजमीन गट नंबर 629 मधील 0.40 आर च्या जमिनीच्या खरेदी पोटी रोख, चेक आणि वेळोवेळी आरटीजीएस द्वारे संशयित अमोल पाटील यांच्या खात्यावर 21 लाख 82 हजार रुपये जमा केले.

यानंतर जमीन नावावर करून देतो असे सांगितले.

मात्र, काही महिने उलटले तरी जमिनीबाबत पुढे काहीच हालचाल झाली नाही. जमीन खरेदीबाबत कमल पाटील यांनी संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कमल पाटील या खरेदी करणारी मिळकत ही संशयितांनी दुसर्‍या व्यक्तीला विक्री केल्याची माहिती मिळाल्या नंतर आपली फसवणूक झाल्याचे कमल पाटील यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज