rajkiyalive

sangli crime news : जिल्ह्यात वर्षभरात 19 हजार लिटर दारू तर 99 हजार लिटर हातभट्टी जप्त

sangli crime news : जिल्ह्यात वर्षभरात 19 हजार लिटर दारू तर 99 हजार लिटर हातभट्टी जप्त  : सांगली : जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुक्ल विभागाने देशी विदेशी दारू, बिअर, हातभट्टी आणि अवैध ताडी असा एकूण 19 हजार लिटरचा मुद्देमाल जप्त केला. ठिकठिकाणी सुरु असणार्‍या हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापा टाकून 99 हजार लिटर हातभट्टीचे रसायन नष्ट केले. या कारवाई दरम्यान एकूण 1 हजार 187 गुन्हे दखल केले असून 1 हजार 169 जणांना अटक केली आहे. या कारवाईत 2 कोटी 58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शासनाचा महसूल बुडवून अवैध रित्या दारूची तस्करी करणार्‍यांवर उत्पादन शुल्कची करडी नजर असल्याने कारवायांची संख्या लक्षणीय आहे.

sangli crime news : जिल्ह्यात वर्षभरात 19 हजार लिटर दारू तर 99 हजार लिटर हातभट्टी जप्त

राज्य शासनाला सर्वात जास्त महसूल हा राज्य उत्पादन शुल्क विभागात देत असतो. मद्य विक्रीचा हा विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. त्यामुळे या विभागाकडे लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांचीही नजर असते. दारू, त्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाची परवानगी देणे, परवाने नूतनीकरण करणे, वाहतूक परवाने, विक्री परवाने या सर्व साखळी मधून राज्य शासनाला मोठा महसूल मिळतो. महसूल वाढी बरोबरच बेकायदेशीर दारूची निर्मिती आणि होणारी विक्री थांबवण्याची मोठी जबाबदारी या विभागावर असते.

गोवा राज्यातील दारू स्वस्त मिळत असल्याने छुप्या पद्धतीने अवैधरित्या महाराष्ट्रात बेकायदेशीर आणून तिची विक्री करणार्‍यांवर कारवाई करत अनेक रॅकेट उत्पादन शुल्क विभागाने उध्वस्त केले आहेत. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य प्रकरणी एकूण 1 हजार 187 गुन्हे नोंद केले आहेत यामध्ये एकूण 1 हजार 169 आरोपींना अटक केली आहे. देशी-विदेशी मद्य, बिअर, हातभट्टी दारू, अवैध ताडी असा एकूण 19 हजार लिटर साठा जप्त केला.

त्याचबरोबर 99 हजार लिटर हातभट्टी रसायन नष्ट करण्यात आले. परराज्यातून अवैध रित्या मद्याची महतूक करणार्‍या 110 वाहनांवर कारवाई करत ती जप्त केली आहेत. वर्षभरात एकूण 2 कोटी 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

अन्यथा कठोर कारवाई : उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे.

ज्या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास त्याठिकाणी आम्ही कठोर कारवाई करू. कोणीही धाब्यावर किंवा अन्य अवैध ठिकाणी बसून मद्य प्राशन करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात बंदी असलेल्या मद्याची विक्री करणार्‍यांवर आमच्या भरारी पथकांचे लक्ष असून त्याच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दैनिक जनप्रवासशी बोलताना दिली.

कर्नाटक आणि गोव्यातून अवैध मद्याची तस्करी…

गोवा बनावटीची दारू स्वस्त असल्याने तसेच महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत असते. कर्नाटक आणि गोवा सीमेवरून या मद्याची तस्करी केली जाते. यावर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कची सहा पथके तैनात असतात. या पथकांमध्ये 60 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. या पाठकांमार्फत अवैध दारूवर कारवाई करण्यात येते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज