rajkiyalive

sangli crime news : सांगलीत कंत्राटदाराला 25 हजारांची लाच मागणार्‍या पोलिसांवर गुन्हा दाखल.

sangli crime news : सांगलीत कंत्राटदाराला 25 हजारांची लाच मागणार्‍या पोलिसांवर गुन्हा दाखल. : सांगली : इचलकरंजी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्‍या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर यशवंत पाटणकर (वय 38 रा. सांगली) असे त्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सदरची कारवाई केली. दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्यात सलग दुसर्‍यांदा लाचलुचपतची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

sangli crime news : सांगलीत कंत्राटदाराला 25 हजारांची लाच मागणार्‍या पोलिसांवर गुन्हा दाखल.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात. शनिवार दिनांक 07 डिसेंबर रोजी कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकाम साइटवर एक अल्पवयीन बालक त्याच्या नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता. यावेळी झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक व त्याचे नातेवाईक जखमी झाले होते.

पडताळणीमध्ये 25 हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

सदर जखमींवर मिरज रोडवरील भारती हॉस्पिटल सांगली येथे सुरू होते. सदर अपघात प्रकरणात तक्रारदार यांच्या विरोधात बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदार यांच्या बाजुने घेण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी संशयित शेखर पाटणकर यांनी मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणीमध्ये 25 हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील यांच्या पथकाने केली

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज