sangli crime news : कंपनीची बनावट घड्याळे विकणार्या दोघांवर गुन्हा दाखल : 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त. : सांगली : शहरातील स्टेशन चौक येथे असणार्या बी यु शेख सन्स आणि पटेल चौक येथील भारत वॉच कंपनी येथे टायटन, सोनाटा आणि फास्टट्रॅक कंपनीची बनावट घड्याळ विक्री करणार्या दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. या दोनही दुकानातून 1 लाख 45 हजार 200 रुपयांची घड्याळे पोलिसांनी जप्त केली आहे.
sangli crime news : कंपनीची बनावट घड्याळे विकणार्या दोघांवर गुन्हा दाखल : 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.
सदरची घटना हि शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी गौरव श्यामनारायण तिवारी (रा. द्वारका, नवी दिल्ली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाफर अकबर शेख (वय 51 रा. ख्वाजा वस्ती, मिरज) आणि शशिकांत उत्तम गोंधळे (वय 40 रा. सांगली) या दोघांविरोधात कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहरातील स्टेशन चौक येथे बी. यु. शेख अँड सन्स या नावाने घड्याळाचे दुकान आहे तर दुसरीकडे पटेल चौक येथे भारत वॉच कंपनी नावाने दुकान आहे. सदरच्या दोनही दुकानात टायटन, सोनाटा, फास्टट्रॅक घड्याळ, त्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. या कंपनीचे अधिकारी गौरव तिवारी यांना सदरचा मुद्देमाल हा कंपनीच्या नावाने बनावट विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणाहून जाफर शेख यांच्याकडून टायटनची 50 घड्याळे, 70 नग फास्टटॅक बेल्ट, 140 फास्टटॅक घड्याळाचे डायल आणि शशिकांत गोंधळेकडे 26 सोनाटा घड्याळ, 36 फास्टट्रॅक घड्याळ यांसह मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी याठिकाणाहून 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करत संशयित दोघांवर कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



