संबंधित मुलगा, मुलगी बालकल्यास समितीसमोर हजर
sangli crime news : आटपाडीत बालविवाह रोखला जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश : पलूस तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला हळद लावण्याचा प्रयत्न कुटुंबियांनी केला. त्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली. प्रशासनाने मोठी फिल्डींग लावून बुधवारी आटपाडीत बालविवाह रोखला. संबंधित मुलगा व मुलीस बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
sangli crime news : आटपाडीत बालविवाह रोखला जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
पलूस तालुक्यातील एका गावातील अवघ्या साडेदहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा बेत कुटुंबियांनी आखला होता. त्यानुसार मंडप उभारणीदेखील केली होती. कोणाला काहीच माहिती नाही, अशा आविर्भावात दोन्ही कुटुंबिय होते. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागाला याची कुणकुण लागली. या विभागातील कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. याची गंभीर दखल घेऊन तातडीने हा बालविवाह रोखण्याचे आदेश वरिष्ठांनी अधिकार्यांना दिले. त्यानंतर पोलिस, चाईल्ड लाईन यांच्या मदतीने बालविवाह रोखण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली. मात्र याची कुणकुण लागल्याने मंडप काढण्यात आला.
प्रारंभी सुरूवातीला बालविवाह होणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र अधिकार्यांनी आपली ताकद दाखवल्यानंतर बेळगावमध्ये विवाह होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने बेळगावमध्ये यंत्रणा सतर्क करण्यात आली. मात्र नंतर विट्यात बालविवाह होणार असल्याची माहिती समोर आली. शेवटी यंत्रणेने आटपाडीत सापळा लावून बालविवाह रोखला. संबंधित मुलीस आणि मुलास बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, महिला व बालकल्याण, पोलिस आणि चाईल्ड लाईन यांच्या मदतीने हा बालविवाह रोखण्यात आला.
बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्नशिल
बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. लोकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. कोठे बालविवाह होत असल्यास 1098 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी केले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.