sangli crime news : दुधगावमध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबात हाणामारी: सांगली : मिरज तालुक्यातील दुधगाव मध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार भांडण होऊन हाणामारी झाली. सदरची घटना हि रविवार दि. 30 मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सौ. शोभा शिवाजी गावडे आणि गौरी कुमार सिद यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे.
sangli crime news : दुधगावमध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबात हाणामारी
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोनही कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शोभा गावडे यांच्या फिर्यादीवरून गौरी सिद आणि कुमार सिद तर गौरी सिद यांच्या फिर्यादीवरून सचिन गावडे, शोभा गावडे आणि सुजाता गावडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शोभा गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, सिद यांच्या सोबत गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरु होता. रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शोभा यांचा मुलगा सचिन आणि त्याची पत्नी सुजाता हे दोघेजण घरासमोर बोलत बसले होते. यावेळी गौरी सिद यांनी शिवीगाळ करत सुनेला मारहाण केली.
कुमार सिद याने हातातील कुर्हाडीने सचिन याला मारताना शोभा या मध्ये आल्या असता त्यांना दुखापत झाली. दुसरीकडे गौरी सिद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, संशयित सचिन गावडे हा मोटारसायकलवरून जात असताना त्याने शिवीगाळ केली. त्याबाबत विचारणा करण्यासाठी त्याच्या घरी गेल्या असता संशयित शोभा गावडे आणि सुजाता गावडे यांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण केली.
यावेळी त्यांचे पती आले असता त्यांना सचिन गावडे याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे म्हंटले आहे. दोघांच्याही फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



