rajkiyalive

sangli crime news : ह्युंदाई शोरूम फोडून धाडसी चोरी करणार्‍या सराईतांच्या टोळीचा पर्दाफाश

sangli crime news : ह्युंदाई शोरूम फोडून धाडसी चोरी करणार्‍या सराईतांच्या टोळीचा पर्दाफाश : सांगली : कोल्हापूर रोडवर असणार्‍या माई ह्युंदाई कार शोरूम मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करून दहा लाखांची रोकड लंपास करणार्‍या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या टोळीचा म्होरक्या सराईत गुन्हेगार दिनेश गजेंद्र मोहिते (वय 27 रा. लवाछा ता. वापी राज्य गुजरात) याला राहत्या घरातून अटक केली आहे.

sangli crime news : ह्युंदाई शोरूम फोडून धाडसी चोरी करणार्‍या सराईतांच्या टोळीचा पर्दाफाश

टोळीचा कुख्यात म्होरक्या जेरबंद : स्थानिक गुन्हे अन्वेषणची गुजरात मध्ये कारवाई.

टोळीतील अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुजरात मध्ये जाऊन सदरची कारवाई केली. मुरली मनोहर पवार (रा. उमरगाव जि. वलसाड), करण परलाल मोहिते (रा. सायना, मालेगाव जि. नाशिक) रोहित आणि अक्षय (दोघांचे पूर्ण नाही नाही रा. लवाछा ता. वापी) अशी पसार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय ह्युंदाईचे शोरूम आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शोरूम सुरू असते. बुधवार दि. 11 जून रोजी नेहमीप्रमाणे शोरूम बंद करण्यात आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी शोरूमच्या मागील बाजूने प्रवेश केला. मुख्य दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी आणखी दोघे चोरटे आता आले.

जिन्याखाली असणार्‍या कॅशियर कक्षाजवळ चोरटे आले. तेथील मुख्य दरवाजा न उचकटता काच अलगदपणे काढली. कॅश काउंटरवरून कक्षात प्रवेश करत तेथील गोदरेज कंपनीची तगडी तिजोरी तिघा चोरट्यांनी उचलून बाहेर आणली त्यातील रोख 9 लाख 68 हजारांची रोकड लंपास केली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील लवाछा गावात संशयित दिनेश मोहिते हा त्याच्या घरात मिळाला.

त्याच्याकडे चोरीबाबत कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर चौघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याला ताब्यात घेत सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित दिनेश मोहिते हा गुजरात मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी आणि गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गांजा वाहतुकीच्या गुन्ह्यात वलसाड न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. सदर गुन्ह्यात तो पाच वर्षे जेलमध्ये होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

Gang of innkeepers who broke into Hyundai showroom and committed daring theft exposed

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी संदीप पाटील, बसवराज शिरगुप्पी, श्रीधर बागडी, सुशील म्हस्के, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, ऋतुराज होळकर, अभिजित माळकर, सुमित सूर्यवंशी, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज