sangli crime news : कसबे डिग्रज फाट्यावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक : अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी.: पेठे ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबेडिग्रज गावच्या हद्दीतील इस्लामपूरकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव टँकरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला मार लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी प्रदीप संतराम चव्हाण (वय 40 रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टँकर चालक मारुती माणिक थोरात (वय 56 रा. कालवडे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
sangli crime news : कसबे डिग्रज फाट्यावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक : अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी प्रदीप चव्हाण हे आपली कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये राहतात. बुधवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चव्हाण हे त्यांच्या मोटारसायकल (क्र. एमएच 10 एससी 5294) वरून सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरून इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी निघाले होते.
यावेळी पाठीमागून भरधाव वेगात चालक मारुती थोरात हे त्यांच्या ताब्यातील टँकर (क्र. एमएच 50 टी 3535) हा घेऊन आले. या टँकरने चव्हाण यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात चव्हाण यांच्या डोक्याला आणि पाठीमागं दुखापत होऊन गंभीर जखमी झाले तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.