sangli crime news : सांगलीत भर दिवसा 13 तोळ्याची बॅग लंपास : सांगली : शहरातील पुष्पराज चौक येथे असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धांच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसडा मारून लंपास करणार्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
sangli crime news : सांगलीत भर दिवसा 13 तोळ्याची बॅग लंपास
चालकानेच मारला मित्राच्या मदतीने डल्ला :
चालकानेच मित्राच्या मदतीने दागिने लंपास केल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला. अटकेतील दोघांकडून 13 लाखांचे दागिने, एक टेम्पो, एक दुचाकी असा एकूण 15 लाख 12 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांनी अवघ्या तीन तासात जेरबंद केले. अमोल महेश माने (वय 30 रा. शिवपार्वती कॉलनी, हरिपूर) आणि चालक नितेश रामचंद्र गजगेश्वर (वय 29 रा. हरिपूर रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी धनचंद्र भाऊराव सकळे (वय 87 रा. पत्रकारनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, धनचंद्र सकळे हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत. कर्मवीर पतसंस्थेत ते खातेदार आहेत. सकळे यांनी लग्नकार्यानिमित्त कर्मवीर पतसंस्थेत ठेवलेले दागिने घरात आणले होते. एक मे रोजी सुटी असल्यामुळे शुक्रवारी ते दागिने पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मोटारीतून सकाळी दहाच्या सुमारास निघाले. तत्पूर्वी मोटारीचा चालक नितेश गजगेश्वर याने सकळे यांना घेऊन दागिने ठेवण्यास पतसंस्थेत जायचे असल्याचे ऐकले होते.
त्याने साथीदार अमोल माने याला टीप दिली. त्यानुसार अमोल माने हा दुचाकी (एमएच 10 एएस 4935) वरून त्यांच्या मागावर होता. चालक नितेश याने सकाळी सव्वा दहा वाजता मोटार कर्मवीर पतसंस्थेसमोर थांबवली. सकळे त्यातून खाली उतरल्यानंतर नितेश मोटार पुढे घेऊन गेला. तेवढ्यात मागून आलेल्या अमोल माने याने सकळे यांच्या हातातील दागिन्याची पिशवी हिसडा मारून ताब्यात घेतली. त्यानंतर काही सेकंदात तो शंभरफुटीच्या दिशेने पळाला. सकळे यांनी आरडाओरड करून काही अंतरावर गेलेल्या चालक नितेशला थांबवले. त्यानंतर मोटारीतून त्यांनी चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
परंतू चोरटा पसार झाला होता. सकळे यांनी पतसंस्थेत येऊन हा प्रकार सांगितला. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना प्रकार कळवला. उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. हा प्रकार टीप देऊन केला असल्याची शक्यता वाटल्याने चालक नितेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावरून अमोल माने याला ताब्यात घेतले. तेव्हा सर्व उलगडा झाला.
sangli-crime-news-sangli-crime-news-bag-worth-13-tola-stolen-in-broad-daylight-in-sangli
दोघांनी मिळून कट रचल्याचे स्पष्ट झाले. चोरीचे दागिने अमोल याने मालवाहू टेम्पोमध्ये ठेवले होते. ते जप्त केले. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहायक निरीक्षक कविता नाईक, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, कर्मचारी विशाल भिसे, संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, गणेश बामणे, उमेश कोळेकर आदींच्या पथकाने कारवाई केली.
रेल्वे पोलिसमध्ये भरती होणार होता मात्र अडकला…
अमोल माने हा रेल्वे पोलिस दलात भरतीची तयारी करत होता. त्याने परीक्षा दिली होती. परंतू चारित्र्य पडताळणीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने ‘मॅट’ मध्ये धाव घेतली होती. तत्पूर्वी पैशाच्या अडचणीमुळे त्याने चोरी केली. परंतू पहिल्याच प्रयत्नात तो सापडला. सकळे यांना पत्नीने दागिने लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दागिन्याची पिशवी घेऊन बाहेर पडले. परंतू बरेच दागिने त्यांच्या पत्नीच्या अंगावर राहिले. दागिने चोरीस गेल्यानंतर त्यांना 40 तोळेच दागिने गेले असे वाटले. पोलिसांना तसे सांगितले. परंतू नंतर चौकशीत उर्वरीत दागिने घरीच राहिल्याचे समजले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.