rajkiyalive

sangli crime news : सांगलीत पोलीस कर्मचार्‍याची नैराश्येतून आत्महत्या : पोलीस दलात खळबळ.

सांगली :

sangli crime news : सांगलीत पोलीस कर्मचार्‍याची नैराश्येतून आत्महत्या : पोलीस दलात खळबळ. : जिल्हा पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलनी नैराश्येतून मौजे डिग्रज येथील शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सचिन शिवाजी जाधव (वय 42 रा. मौजे डिग्रजअसे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, त्यांनी मृत्यूपुर्व लिहलेली चिठ्ठी मिळाली असून त्यांनी नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

sangli crime news : सांगलीत पोलीस कर्मचार्‍याची नैराश्येतून आत्महत्या : पोलीस दलात खळबळ.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, सचिन जाधव हे आई-वडील, पत्नीसह मौजे डिग्रज येथे राहण्यास होते. ते पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची जतमधून मुख्यालयात बदली झाली होती. बुधवारी दुपारपासून ते गायब होते. कुटूंबिय, मित्रांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. पण ते मिळून आले नाहीत. गुरुवारी सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांना नागेश इरकर यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी द्रव्याची बाटली होती. तसेच आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहिली होती. त्यात कोणत्याच गोष्टीत यश येत नाही. अपयशामुळे मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जाधव यांच्या आत्महत्येने पोलिस दलाला मोठा धक्का बसला आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा परिवार आहे. दरम्यान, सचिन जाधव हा एकुलता एक होता. त्याच्या बहिणीचा विवाह झाला आहे. त्याला दोन मुले आहेत. सचिनचे वडील बस वाहक होते तर चुलते पोलिस दलात होते. चुलते काही वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. सध्या ते मौजे डिग्रजचे प्रभारी सरपंच आहेत. सचिन यांच्या आत्महत्येने गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज