rajkiyalive

sangli crime news : दुधगावमध्ये पूर्ववैमनसन्यातून तरुणाचा खून

सांगली :

 sangli crime news : दुधगावमध्ये पूर्ववैमनसन्यातून तरुणाचा खून : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे मंगळवारी रात्री कुर्हाडीने तरुणांवर सपासप वार करून जखमी करण्यात आले होते. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शुभम बाबासो मुळे (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर अनिल राजेंद्र केपाडे याला अटक करण्यात आली असून तीन दिवस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

sangli crime news : दुधगावमध्ये पूर्ववैमनसन्यातून तरुणाचा खून

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत शुभम हा ट्रॅक्टर चालक आहे. तो गावातील शेतीची काम करतो. तर हल्लेखोर अनिल हा मजुरी करतो. 2018 साली दोघांत काही कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून दोघांत धुसफूस सुरू होती. मंगळवारी रात्री रात्री पावणे नऊच्या सुमारास शुभम मुळे दुधगाव बसस्थानक चौकात थांबला होता. हल्लेखोर अनिल हा दुचाकीवर तिथे आला. त्याने कुर्हाडीने शुभमवर हल्ला केला. पाठ, कंबर, हातावर सपासप वार केले.

हल्ल्ल्यानंतर शुभम रक्ताच्या थोराळ्यात कोसळला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याचा माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी शुभमचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनिल केपाडे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. हल्लेखोर अनिलच्या शोधासाठी पथकेही रवाना झाली होती. अनिल याला कुंभोज (ता. हातकणंगले)येथून अटक करण्यात आली.

पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चौगले यांनी दिली.

चार दिवसापूर्वी आणली कुर्हाड
अनिल केपाडे याच्यावर यापूर्वी शस्त्र घेऊन रात्री संशयितरित्या फिरतानाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधकात्मक कारवाई केली होती. 2018 मध्ये त्याचा शुभमशी वाद झाला होता. तेव्हापासून हा वाद धुमसत होता. शुभमवर हल्ला करण्यासाठी त्याने चार दिवसांपूर्वी नवीन कुर्हाड बनवून घेतल्याची चर्चा गावात होती. शुभम याने स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. शेतीची कामे करून तो कुटूंबाचा चरितार्थ चालवित होता. तो एकुलता मुलगा होता. त्याचा बहिणीचा विवाह झाला आहे. त्याने नुकतेच नवीन घर बांधले होते. पुढील आठवड्यात घराची वास्तूशांती करणार होता. त्यातच त्याच्या वडीलांना पोटाचा विकार होता. बुधवारी तो वडिलांना दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी दाखल करणार होता. पण त्या आधीच त्याच्यावर काळाने घाला घातला

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज