sangli crime news : खानापूरात मोटरसायकलच्या भीषण अपघातात तरूण जागीच ठार : विजापूर – गुहागर महामार्गावर खानापूर येथील पेट्रोल पंप व महात्मा गांधी विद्यालय खानापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी नऊ वाजता मोटरसायकल (क्र.एम.एच. 10 सी. सी 8404) डिलक्स व टमटम (क्र.एम एच 45 ए.एफ. 6669) यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन यामध्ये आयुष रवी धेंडे (वय 17) हा जागीच ठार झाला. तर कृष्णा संजय पाखरे (वय 17) हा जखमी झाला.
sangli crime news : खानापूरात मोटरसायकलच्या भीषण अपघातात तरूण जागीच ठार
टमटम चालक सुरज तानाजी होवाळ हातीत तालुका सांगोला हे गाडीत मका बियाणे घेऊन विट्याकडे चालले होते. तर मोटरसायकलवरून आयुष व कृष्णा हे पेट्रोल पंपावरून वडिलांना डबा देऊन खानापूर कडे चालले होते. पेट्रोल पंप पासून जवळच उतारा वरती हा भीषण अपघात झाला अपघातात मोटरसायकल चा पुढील भाग चक्काचूर झाला आहे .
खानापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर व टीम दुसर्या एका तपासासाठी निघाले असता रोडवरतीच अपघात झालेले घटनास्थळी लगेच पोहचले त्यानंतर जखमी कृष्णा पाखरेस पुढील उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट येथे हलविण्यात आले आहे. आयुष धेंडे व कृष्णा पाखरे दोघेही बारावी सायन्स मध्ये शिकत असून आयुशच्या अचानक जाण्याने खानापूर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल पंप ते खानापूर बस स्थानक हा उतरणीचा भाग असून सर्वच लहान मोठी वाहने नेहमीच भरधाव वेगाने येत असतात त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करत आहेत

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



