rajkiyalive

SANGLI CRIME : सांगलीत डोळ्यात चटणी टाकून, गळ्याला चाकू लावून घर लुटले

सांगली : SANGLI CRIME : सांगलीत डोळ्यात चटणी टाकून, गळ्याला चाकू लावून घर लुटले  : संजयनगर परिसरातील दुधाळ शाळेजवळ एका घरात अज्ञात तिघांनीं घुसून घरातील व्यक्तींच्या डोळ्यात चटणी टाकून, गळ्याला चाकू लावत सोन्याचांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना घडली. सदर लुटीची घटना हि शुक्रवार दि. 05 जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सौ. संगीता राजेंद्र ठोंबरे (वय 55 रा. दत्त कॉलनी, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SANGLI CRIME : सांगलीत डोळ्यात चटणी टाकून, गळ्याला चाकू लावून घर लुटले

याबाबत अधिक माहिती अशी कि, सौ. संगीता ठोंबरे या आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील दत्त कॉलनी मध्ये राहतात. शुक्रवार दि. 05 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमरास त्यांच्या पती सोबत जेवण करून घरात बसल्या होत्या. यावेळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात तिघे चोरटे त्यांच्या घरात घुसले. त्यांचे पती राजेंद्र ठोंबरे यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना जखमी केले.

दागिन्यांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल केला लंपास.

यानंतर संगीता यांच्या पोटाला आणि गळ्याला विळा लावून त्यांच्या गळ्यातील बोरमाळ, कानातील कर्णफुले काढून घेतली तसेच घरातील डब्यात ठेवलेले गंठण घेतले. यानंतर घरात असलेले दोन मोबाईल घेऊन तिघा चोरट्यांनी पलायन केले. घडलेल्या या घटनेनंतर संगीता ठोंबरे यांनी मध्यरात्री संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी तातडीने पथके तैनात केली. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या लुटीच्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज