rajkiyalive

SANGLI CRIME : म्हैसाळमध्ये वैरण आणण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू ; एक जखमी

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत : पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे

मिरज / प्रतिनिधी
SANGLI CRIME : म्हैसाळमध्ये वैरण आणण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू ; एक जखमी : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील सुतारकी मळा येथे राहणारे पारीसनाथ मारूती वनमोरे (वय 40) त्यांचा मुलगा साईराज परिसनाथ वनमोरे (वय 13) तसेच पुतण्या प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय 38) हे जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर पारीसनाथ यांचा दुसरा मुलगा हेमंत हा जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वनमोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर म्हैसाळ गावात शोककळा पसरली आहे.

SANGLI CRIME : म्हैसाळमध्ये वैरण आणण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू ; एक जखमी

घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, पारीसनाथ व त्यांचा मुलगा हेमंत तसेच साईराज हे तिघेजण जनावरांना वैरण आणण्यासाठी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वड्याकडे असलेल्या शेताजवळ गेले. वैरण काढत असताना अचानक पारीसनाथ यांच्या पायाला ऊसात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्यानंतर पारीसनाथ यांना जोराचा झटका बसल्यानंतर जागेवरच कोसळले. वडीलांना वाचविण्यासाठी म्हणून हेमंत हा त्यांना काढण्यासाठी म्हणून पुढे गेले असता त्यालाही जोराचा विजेचा झटका बसल्याने तो दूरवर कोसळला.

sangli-crime-shocked-death-of-three-who-went-to-bring-violence-in-maisal-one-injured

दोघेही कोसळल्याचे पाहून साईराज हा तेथून पळत आपले चुलत काका प्रदीप वनमोरे यांना सर्व माहिती सांगितली. प्रदीप व साईराज हे दुसर्‍या बाजूने जात होते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा पाळीव कुत्राही होता. ऊसात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श साईराज व प्रदीप यांना झाला. दोघेही जागेवरच कोसळले तसेच पाळीव कुत्र्याचा जागेवरच मृत्यू झाल होता. हेमंतला त्यांचे आजोबा येवून तारेजवळून बांबूने ओढून घेतले. त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तोपर्यंत नातेवाईक त्यांच्या पाठीमागून येत असताना त्यांना साईराज आणि प्रदीप यांना विजेच्या तारेचा स्पर्श झाला. दोघेही जागीच कोसळल्याचे पाहताच नातेवाईकांना विजेचा प्रवाह चालू असल्याचे लक्षात आल्यानंतर याची माहिती माहिती वीज वितरण विभागाला दिल्याने तात्काळ विजेचा प्रवाह बंद झाला. जखमी अवस्थेत असलेला हेमंत तसेच पारीसनाथ, साईराज, प्रदीप यांना तात्काळ उपचारासाठी घेवून गेले. परंतु उपचारापूर्वीच पारीसनाथ, साईराज, प्रदीप यांचा मृत्यू झाला होता. तर हेमंत याच्यावर शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे म्हैसाळ गावात शोककळा पसरली आहे.

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत : ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे

पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शासकीय रूग्णालयात जखमी असलेल्या पंधरा वर्षाच्या हेमंतची भेट घेतली. हेमंत हा बेधरलेल्या अवस्थेत होता. पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी त्याला धीर दिला. पालाकमंत्र्यांंचे डोळेही पाणावले होते. हेमंतच्या आजोबांची भेट घेवून तुम्ही भिऊ नका आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. तसेच मृत नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच वीज वितरणच्या भोंगळ कारभाराची चौकशी केली जाईल. या घटनेमध्ये कोणी दोषी असल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज