इस्लामपूर : प्रतिनिधी
SANGLI CRIME : महाविद्यालयीन युवकावर अनैसर्गिक अत्याचार करणार्या पोलिसाला तीन वर्षे सक्तमजुरी : महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या गर्लफ्रेंडशी शरीर संबंधास नकार दिल्याचा राग मनात धरून त्या युवकावरच पोलीस कर्मचार्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार 3 वर्षापूर्वी इस्लामपूरात घडला होता. अनैसर्गिक अत्याचार व खंडणीप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा तत्कालीन कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय 37) याला 3 वर्षे सक्तमजुरी व 21 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायाधीश हेमंत पांचोली यांनी ठोठावली.
SANGLI CRIME : महाविद्यालयीन युवकावर अनैसर्गिक अत्याचार करणार्या पोलिसाला तीन वर्षे सक्तमजुरी
याबाबत माहिती अशी, पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेला कर्मचारी 27 ऑक्टोबर 2011 रोजी पहाटे 3 वाजता पेट्रोलिंग करताना पिडीत मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटून वसतीगृहात जात होता. आरोपी हणमंत देवकरने त्यास अडवून कोठून आलास इथे असे विचारले असता पिडीतने मैत्रिणीला भेटून आल्याचे सांगितले. त्यावेळी हणमंत देवकरने पिडीतास संपूर्ण माहिती देत त्याचा मोबाईल नंबर दिला. 29 ऑक्टोबर रोजी त्या युवकास हणमंत देवकरने फोन करून कॉलेजच्या गेटवर भेटायला बोलावले. युवक हणमंत देवकरला भेटल्यावर त्याच्या मैत्रिणीच्या प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी केली.
त्याने घाबरून कॉलेजमधील मित्रांकडून 4 हजार रुपये उसणे घेवून पोलीस देवकरला दिले.
परंतु त्याचे समाधान झाले नाही. हणमंत देवकरने पिडीतास मैत्रिणीचा नंबर मला दे व तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग असा दम भरला. पिडीताने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. तुझ्या मैत्रिणीसोबत शरीरसंबंध करायला देत नसशील तर तुझ्यासोबत शरीरसंबंध करणार अशी धमकी देवकरने दिली. हणमंतने पिडीतास रूमवर नेवून शरीरसंबंध करताना अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ केला. 21 ऑक्टोबरला दुपारी 12.30 च्या सुमारास हणमंतने पुन्हा पिडीत मुलास मोबाईलवरुन फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संभोगाची मागणी केली. मोबाईल मधील अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ दाखविला. तु माझ्यासोबत आला नाहीस तर व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली.
याबाबतची तक्रार पीडित युवकाने इस्लामपूर पोलीसात दिली. पो.कॉ.हणमंत देवकरला अटक करण्यात आली.
या केसची सुनावणी न्या.हेमंत पांचोली यांच्या कोर्टात सुरु होती. सरकारपक्षातर्फे एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत, त्याचे मित्र व इतर संबंधितांचे जबाब महत्वपूर्ण ठरले. अनैसर्गिक अत्याचार व खंडणीप्रकरणी हणमंत देवकरला 3 वर्षे सक्तमजुरी व 21 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायाधीश हेमंत पांचोली यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.भैरवी मोरे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पो.नि.शशिकांत चव्हाण यांनी केला.पो.हे.कॉ.संदीप शेटे यांचे सहकार्य लाभले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.