rajkiyalive

SANGLI CRIME :विट्यातील विशाल पाटील टोळी चार जिल्ह्यातून तडीपार : पोलीस अधीक्षकांच्या दणका : टोळीतील सात जणांचा समावेश. 

सांगली :

SANGLI CRIME :विट्यातील विशाल पाटील टोळी चार जिल्ह्यातून तडीपार : पोलीस अधीक्षकांच्या दणका : टोळीतील सात जणांचा समावेश.  : विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील पाच वर्षात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विशाल पाटील टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. या टोळी विरोधात २०१९ ते २०२३ या कालावधीत खून खुनाचा प्रयत्न, रिव्हॉल्वर घेऊन दहशत माजवणे यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

sSANGLI CRIME :विट्यातील विशाल पाटील टोळी चार जिल्ह्यातून तडीपार : पोलीस अधीक्षकांच्या दणका : टोळीतील सात जणांचा समावेश. 

हद्दपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख विशाल प्रशांत पाटील (वय २४ रा. शाहूनगर, विटा), सदस्य अमरजित अनिल क्षीरसागर (वय २२ रा. पाटील वस्ती, विटा), शुभम महेश कोळी (वय २५ रा. कदमवाडा, विटा), किसन राजेंद्र काळोखे (वय ३०), विजय राजेंद्र काळोखे (वय २४), सागर देवेंद्र गायकवाड (वय २७) आणि अमृत राजेंद्र काळोखे (वय २४ चौघे रा. विवेकानंदनगर, विटा) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विशाल पाटील या टोळीविरुद्ध सन २०१९ ते २०२३ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खुन, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर बिगरपरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत माजवणे, गैरकायदयाची मंडळी जमवून इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, अपहरण करून इच्छापुर्वक दुखापत करणे, बांधकामास लागणारे साहित्याची तसेच मोटारसायकल व इतर चोरी करणे यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची टोळी कायदा जुमानत नसल्याने विटा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना हद्दपारीची प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेतली.
त्यानुसार टोळीतील सात जणांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्हयातुन २ वर्षांसाठी तडीपारीचे आदेश दिले. जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शरद मेमाणे, कर्मचारी अमोल ऐदाळे, अमर नरळे, दिपक गट्टे, विलास मोहिते, वैभव कोळी यांच्या पथकाने केली.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज