rajkiyalive

SANGLI FLOOD NEWS : सांगलीकरांना पुराची धास्ती ; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी नदी काठच्या नागरिकांनी स्थलांतराचे आदेश : सांगलीत 24 तासात 10 फुटाने पाणी वाढले

sangli-flood-news-sanglikars-are-afraid-of-floods-warna-bahe-takari-residents-of-baghphuti-river-banks-ordered-to-evacuate-water-rose-by-10-feet-in-24-hours-in-sangli

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI FLOOD NEWS :सांगलीकरांना पुराची धास्ती ; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी नदी काठच्या नागरिकांनी स्थलांतराचे आदेश : सांगलीत 24 तासात 10 फुटाने पाणी वाढले : कोयना व वारणा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सध्या आयर्विन नदीची पाणी पातळी 28 फुटांवर गेल्याने नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळरोड यासह नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरचे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे. तर नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

SANGLI FLOOD NEWS : सांगलीकरांना पुराची धास्ती ; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी नदी काठच्या नागरिकांनी स्थलांतराचे आदेश : सांगलीत 24 तासात 10 फुटाने पाणी वाढले

दरम्यान कोल्हापुरातही जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शिरोळ तालुक्यातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत. वाळवा तालुक्यातील ताकारी, बोरगाव येथे ढगफुटी झाली आहे.

sangli-flood-news-sanglikars-are-afraid-of-floods-warna-bahe-takari-residents-of-baghphuti-river-banks-ordered-to-evacuate-water-rose-by-10-feet-in-24-hours-in-sangli

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त शुभम गुप्ता व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी संभाव्य पूर स्थितीचा आढावा घेतला. आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधा सहसतर्क आहेत. एन. डी. आर. एफ. टीम आणि महापालिका अग्निशमन दल, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.

पालिकेची वॉर रुम चोवीस सात कार्यरत आहे. पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनच्या सुचनेचे पालन करून सहकार्य करावे. प्रशासनाने यापूर्वी सोबत घ्यावयाची महत्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्या सोबत अत्यावश्यक साहित्य घेऊन मनपाने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे, असे अवाहन शुभम गुप्ता यांनी केले

शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून 77.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा (चांदोली) धरण परिसर, वाळवा तालुक्यातील बहे, ताकारी आणि कासेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या ठिकाणी 100 ते 125.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 28.2 मिलिमीटर पाऊस झाला असून कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दुपारी 26 फुटापर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे.

sangli-flood-news-sanglikars-are-afraid-of-floods-warna-bahe-takari-residents-of-baghphuti-river-banks-ordered-to-evacuate-water-rose-by-10-feet-in-24-hours-in-sangli

जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरु झाला आहे. शिराळा तालुक्यात चरण, शिराळा, कोकरुड परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वारणा-चांदोली धरण परिसरात चौवीस तासात 104.8 मिली मीटर वाळवा तालुक्यातील बहे 125.8 मि.ली., कासेगाव 95.3 मि.ली., ताकारी परिसरात 125.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी ढगफुटी सदृश्य असाच पाऊस होता, असे सांगितले. पावसाचा जोर वाढल्यामुळे सोमवारी दुपारी कृष्णा नदीचीसांगली आर्यविन पुल येथे 26 फुटापर्यंत पाणीपातळी गेली होती.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 21.5 (343), जत 2 (255.8), खानापूर 12.1 (276.5), वाळवा 60.8 (518.3), तासगाव 14.1 (342.4), शिराळा 77.8 (722.1), आटपाडी 2.4 (228.3), कवठेमहांकाळ 7.6 (340), पलूस 32.3 (357.8), कडेगाव 22.7 (345).

चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून आजपासून विसर्ग सुरू

वारणावती : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. सध्या धरण परिसरात सलग चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची अतिवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 148 मिलीमीटर पाऊस धरण पाणलोट क्षेत्र व परिसरात झाला आहे. तर आजपर्यंत एकूण 1641 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद वारणावती पर्जन्यमापक केंद्रावर झाली आहे. धरणाची पाणीपातळी 619.25 मीटर इतकी झाली असून धरणात 27.35 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण 79.48 टक्के भरले आहे.

sangli-flood-news-sanglikars-are-afraid-of-floods-warna-bahe-takari-residents-of-baghphuti-river-banks-ordered-to-evacuate-water-rose-by-10-feet-in-24-hours-in-sangli

धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडवा पातळीवरील वक्राकार दरवाज्यातून मंगळवारी सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. सध्या धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 1595 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होत आहे. तसेच परिसरातील ओढयांना देखील पूर आला आहे त्याचेही पाणी नदीपात्रात आल्याने नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीकाठच्या गावांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शिरोळ तालुक्यातील चार प्रमुख मार्गावर पुराचे पाणी

जयसिंगपूर /प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून शिरोळ तालुक्यात दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुराच्या पाण्याने कुरुंदवाड – शिरढोण, नांदणी – शिरढोण, हेरवाड – अब्दुललाट व नांदणी – शिरोळ हे चार प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पर्याय मार्गाने वाहतूक सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजना केल्या असून, नदी काठावरील गावे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शिरढोण – कुरुंदवाड दरम्यानच्या मार्गावरील पुलावरून रविवार पासून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिरढोण ग्रामपंचायत व कुरुंदवाड नगरपालिका यांचेकडून बॅरिकेड्स लावुन जाण्या व येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिरढोण – नांदणी मार्गावर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. आज सोमवारी सायंकाळी हेरवाड – अब्दुल्लाट व नांदणी – शिरोळ हे दोन मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरही प्रशासनाचे वतीने बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. सध्या शिरोळ तालुक्यात आज सोमवारी 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. याचबरोबर शिरोळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने तालुक्यातील विविध गावात नौका आणि बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याचं बरोबर तहसील कार्यालयात एक्स्ट्रा 5 यांत्रिकी बोटी ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून वजीर रेस्क्यू फोर्स चे रऊफ पटेल व त्यांची टीम पुरपट्ट्यातील नदीकाठावर ग्रस्त घालत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज