rajkiyalive

सांगलीच्या गुंडाची कोल्हापूरात आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; घातपाताचा नातेवाईकांना संशय.

सांगली :

सांगलीच्या गुंडाची कोल्हापूरात आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; घातपाताचा नातेवाईकांना संशय.  हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील डोंगरात सडलेल्या आवस्थेत सापडलेला मृतदेह सागर चंद्रकांत शेंडगे (वय 33, रा. साई मंदिर, अभयनगर, सांगली) याचा असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सांगलीत खुनासह खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असून गेल्या पंधरा दिवसांपासून तो पसार होता.

सांगलीच्या गुंडाची कोल्हापूरात आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; घातपाताचा नातेवाईकांना संशय.

काल रात्री त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. आत्महत्या असल्याचे समोर आले. दरम्यान, त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पेठवडगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सावर्डे-नरंदे रोडवर पुलाजवळ डोंगराकडे रस्ता जातो. या रस्त्याने काही मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी झुडपातुन दुर्गधी येत असल्यामुळे त्यांनी पाहणी केली असता. तरुणाचा सडलेला मृतदेह दिसुन आला.

मृतदेहाशेजारी विषाची बाटली व दुचाकी (एमएच 10 ईसी 3440) पडलेली होती.

याबाबत त्यांनी पेठवडगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता मृतदेहाशेजारी विषाची बाटली व दुचाकी (एमएच 10 ईसी 3440) पडलेली होती. या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमीक अंदाज आहे. त्याने आठ दिवसापुर्वी आत्महत्या केली असावी. या परिसरात शेतकरी, मेंढपाळाव्यतिरीक्त कोणीही जात नसल्यामुळे ही घटना लवकर उघडकीस आली नाही.

मृत सागर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. नुकताच तो मोक्यातून जामिनावर बाहेर होता.

मृतदेहाची सावर्डे प्राथमीक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, मृत सागर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. नुकताच तो मोक्यातून जामिनावर बाहेर होता. खंडणीच्या गुन्ह्यात सांगलीतील संजयनगर पोलिसांना पाहिजे असलेला संशयित आरोपी होता. गेल्या पंधरा दिवस बेपत्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याचा शोध सांगली पोलिस घेत होते.

त्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नातेवाईक रात्री उशीरा सावर्डे येथे पोचले. त्यांनी घात-पाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज