rajkiyalive

sangli jayashri patil news : हरिपुरमध्ये विकासकामांचा दुष्काळ संपवणार: जयश्री पाटील

sangli jayashri patil news : हरिपुरमध्ये विकासकामांचा दुष्काळ संपवणार: जयश्री पाटील : हरिपुरच्या विकासासाठी मी कटीबध्द असून येणार्‍या काळात गावचा कायापालट केल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवाय प्रलंबित कामे देखील मार्गी लावू. जनतेने संधी दिल्यास हरिपूर गावातील विकासकामांचा दुष्काळ संपविणार असल्याची ग्वाही सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी दिली.

sangli jayashri patil news : हरिपुरमध्ये विकासकामांचा दुष्काळ संपवणार: जयश्री पाटील

कृष्णा-वारणा नदीच्या तिरावर वसलेल्या हरिपूर गावात अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा प्रचार दौरा पार पडला. ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. हनुमान मंदिर येथे प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. धनगरी ढोल व फटाक्यांची आतिषबाजीत प्रचार फेरी निघाली. प्रचार फेरी ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.जागोजागी महिलांनी औक्षण केले.

जयश्री पाटील म्हणाल्या, हरिपूर गावाने स्व. मदन पाटील यांना मोठी साथ दिली होती. तशीच साथ मलाही द्या. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच माझा विजय होईल. मला पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी द्या. पाच वर्षात मतदारसंघांचा चौफेर विकास करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे, महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी पाठबळ देऊ अशी ग्वाही जयश्री मदन पाटील यांनी दिली

संजय सावंत म्हणाले, विद्यमान आमदार गाडगीळ यांची गावात भरपूर नाराजी आहे. गावात ठराविक लोकांना हाताशी धरून कारभार सुरू आहे. गावच्या हितापेक्षा कार्यकर्ता जगला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. ऐन दिवाळीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. सांगली रस्त्याची मागणी नसतानाही टक्केवारीसाठी रस्त्याचे काम सुरू झाले. मुदत संपूनही रस्त्याचे काम अपुरे आहे. मूलभूत सुविधेपासून गाव वंचित आहे. गटारी, पिण्याच्या पाण्याची समस्या, तरुणांना रोजगार या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली.

यावेळी नितीन खोत, संपत चौधरी, संभाजी कारंडे, माजी सभापती मीना बावधनकर, गणेश मोहिते, संभाजी मोहिते, गजानन फाकडे, राजाराम सूर्यवंशी, रुपेश बावधनकर, कुमार सूर्यवंशी, यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज