rajkiyalive

SANGLI : जिल्ह्यातील 10 लाख जनावरांना ईअर टॅग बंधनकारक

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI : जिल्ह्यातील 10 लाख जनावरांना ईअर टॅग बंधनकारक : सांगली ः जनावरांचे ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) असल्याशिवाय 1 जूननंतर कोणत्याही जनावराची खरेदी-विक्री करता येणार नाही. जिल्ह्यात 10 लाख 44 हजार जनावरांची संख्या आहे, त्यापैकी सुमारे 8 लाख 49 हजार जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले आहे. 31 मेपर्यंत जिल्ह्यातील 100 टक्के पशुपालकांची पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून जनावरांचे ईअर टॅगिंग करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. दरम्यान राज्य आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या ईअर टॅगिंगबाबत शेतकर्यांत जनजागृती केलेली नसून प्रशासन सुस्त असल्याच ेस्पष्ट झाले.

SANGLI : जिल्ह्यातील 10 लाख जनावरांना ईअर टॅग बंधनकारक

1 जूनपासून टॅग नसल्यास खरेदी-विक्री बंद, बिल्ल्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (12 अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे ईअर टॅगिंग रेकॉर्ड करणार आहे. परिणामी, जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहणार आहे.

भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात जनावरांचे ईअर टॅगिंग करण्यात येत आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ’कानावर बिल्ले’ असल्याशिवाय 1 जून 2024 नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत. जिल्ह्यात 2019 च्या पशुगणनेनुसार 10 लाख 44 हजार 893 जनावरे आहेत. आतापर्यंत जवळपास 90 टक्के जनावरांचे ईअर टॅगिंग करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी, व्यापार्यांनी आपल्या जनावरांचे ईअर टॅगिंग करून घेण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सुस्त

जिल्ह्यात सुमारे 12 लाखाहून अधिक पशुधन आहे, मात्र जिल्ह्यात अवघी 10 लाख 44 हजार जनावरांची नोंदणी आहे. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांसाठी नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्यांना मिळणार नाही. याशिवाय अन्य लाभ बिल्ला असल्याशिवाय कोणताही लाभ मिळणार नाही. ही वस्तुस्थिती असताना पशुसंवर्धन विभागाकडून ईअर टॅगिंगबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. शेतकर्यांची गरज म्हणून बिल्ला मारण्यासाठी शेतकरी प्रयत्नशिल असून जिल्हा परिषद आणि राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग सुस्त असल्याचे दिसून येते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज