rajkiyalive

SANGLI : जिल्ह्यातील 62 हजार निराधारांची हयातीच्या दाखल्यासाठी धावपळ, प्रशासनाच्या कारभारावरुन नाराजी

जनप्रवास । अनिल कदम

SANGLI : जिल्ह्यातील 62 हजार निराधारांची हयातीच्या दाखल्यासाठी धावपळ, प्रशासनाच्या कारभारावरुन नाराजी : सांगली ः ज्यांना कोणताही आधार नाही, त्यांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला अनुदान देण्यात येते. आता सरकारकडून थेट डीबीटीव्दारे लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात 61 हजार 869 निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या निराधार लाभार्थींची हयातीचा दाखला देण्यासाठी धावपळ सुरु आहे. अशातच मिरजेतील तहसिलदार कार्यालयात दाखल जमा करण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या सखुबाई बनसोडे या 80 वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसल्याने वृद्धेला जीव गमवावा लागला, या प्रकारावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

SANGLI : जिल्ह्यातील 62 हजार निराधारांची हयातीच्या दाखल्यासाठी धावपळ, प्रशासनाच्या कारभारावरुन नाराजी

केंद्र आणि राज्य शासनाकडून वृद्ध,निराधार आणि दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. सरकारकडून जिल्हास्तरावर अनुदान वर्ग होते, त्यानंतर तहसिलदार कार्यालयाकडे लाभार्थीनुसार निधी दिला जातो. या कार्यालयातून संबंधित बँकेच्या लाभार्थींच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येतो. या प्रक्रियेला विलंब होत असल्याने निराधार लाभार्थींना वेळेत अनुदान मिळत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. वृद्ध आणि निराधारांना अनुदानासाठी हेलपाटे जमा झाल्याची खात्री वारंवार बँकेत जावून करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले. सरकारच्या या पद्धतीवर अनेकवेळा सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचार्‍यांची कसरतही थांबणार आहे.

संजय गांधी निराधार’ व ’श्रावणबाळ’ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचार्‍यांची कसरतही थांबणार आहे. या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळवले जात आहे. निराधार व्यक्तींना आता कागदपत्रे अपडेट करून घ्यावी लागतील. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात. सांगली जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेची 41 हजार लाभार्थी आहेत.

याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण योजनेचे 16 हजार 60 लाभार्थी आहेत.

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 4 हजार पाच, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे 672, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचे 127 लाभार्थी आहेत. निराधार योजनेचे जिल्ह्यात 62 हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थींना हयातीचा दाखला द्यावा लागणार असल्याने निराधारांची धावपळ सुरु आहे.

सखुबाई बनसोडे या 80 वर्षाच्या वृद्धेला जीव गमवावा लागला.

मिरजेतील तहसिलदार कार्यालयात दाखल जमा करण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या सखुबाई बनसोडे या 80 वर्षाच्या वृद्धेला जीव गमवावा लागला. दाखले जमा करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसल्याने जीव गमावण्याची वेळ आली आहे. या प्रकारावरुन निराधारांसह सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सरकार आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे निराधारांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील निराधार, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी

क्र. योजना लाभार्थी
1. संजय गांधी निराधार 40,255
2. श्रावणबाळ निवृत्तीवेतन 16,060
3. इंदिरा गांधी वृद्धापकाळ 4,005
4. इंदिरा गांधी विधवा 672
5. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग 127

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज