सांगली :
SANGLI : कवठेपिरानमध्ये सील केलेल्या घराचा घेतला बेकायदेशीर ताबा : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावातील एक घर न्यायालयाच्या आदेशाने आधार हाऊसिंग फायनान्स या कंपनीने सील केले होते. सदरच्या घराचे सील तोडून बेकायदेशीर ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याचबरोबर बँकेच्या अधिकार्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली.
SANGLI : कवठेपिरानमध्ये सील केलेल्या घराचा घेतला बेकायदेशीर ताबा
बँकेच्या अधिकार्यांना केली शिवीगाळ : तिघांविरोधात गुन्हा दाखल.
सदरची घटना हि शुक्रवार दि. 10 मे रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी फायनान्स कंपनीचे कर्मचारी विवेक वसंतराव देशमुख यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शीतल अर्जुन पाटील, अमोल अर्जुन पाटील, अर्चना अर्जुन पाटील (सर्व रा. कवठेपिरान) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आधार हाऊसिंग फायनान्स या कंपनी मधून संशयितांनी कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या थकितापोटी सांगली मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने संशयितांची कवठेपिरान येथील घर सील करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे फायनान्स कंपनीने सदरचे घर सील केले होते. शुक्रवार दि. 10 मे रोजी संशयित तिघांनी सील केलेल्या घराचे कुलूप तोडून बेकायदेशीर घरामध्ये प्रवेश केला. प्रॉपर्टी व्हॅल्यूवेशन साठी आलेल्या बँकेच्या अधिकार्यांना शिवीगाळ करत धमकी देऊन परत पाठवले.
तसेच सील केलेल्या मालमत्तेचे नुकसान केले. घडलेल्या या प्रकारानंतर आधार हाऊसिंग फायनान्स या कंपनीचे कर्मचारी विवेक देशमुख यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
000000000000000000
दोन महिलांमध्ये झाली फ्रीस्टाईल हाणामारी : महिलेविरोधात गुन्हा दाखल.
सांगली : एका परस्त्री सोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा संशय विवाहितेला होता. त्या विवाहितेने भावयजय सोबत नवर्याचा पाठलाग केला. सदरच्या महिलेचा पती हा एका महिलेच्या घरात नको त्या अवस्थेत सापडला आणि नवर्याची बिंग फुटले.
यानंतर दोन महिलांमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर झालेल्या हाणामारीत एका महिलेचा कान फाटला. सदरची घटना हि सोमवार दि. 27 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शामरावनगर परिसरात घडली. या प्रकरणी जखमी विवाहितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी विवाहिता हि आपल्या पती आणि मुलांसह माधवनगर रोडवरील बायपास मार्गावरील एका अपार्टमेंट मध्ये राहते. सोमवार दि. 27 मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित विवाहितेचा पती हा संशयित महिलेच्या घरी शामरावनगर मध्ये आहे असे समजले. यावेळी विवाहितेने आपल्या भावजयसोबत थेट त्या परस्त्रीचे घर गाठले. यावेळी महिलेचा पती आणि दुसरी महिला नकोत्या अवस्थेत त्यांना दिसले. यानंतर विवाहिता आणि त्या महिलेमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. घडलेल्या प्रकाराबाबत विवाहिता हि जाब विचारत असताना समोरच्या महिलेने हातांनी मारहाण करण्यास सुरवात केली.
विवाहितेचे केस ओढून कानातील सोन्याच्या साखळीला जोराचा हिसडा बसल्याने कान फाटून जखमी केले. घडलेल्या या प्रकारानंतर विवाहितेने थेट सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.