चार वर्षापासूनची प्रतिक्षा संपली, 90 दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश
sangli local news : सांगलीला प्रधानमंत्री आवासमधून तब्बल 27 हजार घरकुलं : केंद्र सरकारने सर्वांना घर देण्याची पुन्हा घोषणा केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 59 हजारांवर लाभ0ार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या चार वर्षापासून प्रतिक्षेत होते, मात्र मंजुरी मिळाली नाही. गतवर्षी केवळ 5 हजार 248 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आता केंद्र सरकारने सांगली जिल्ह्यासाठी वाढीव तब्बल 27 हजार 459 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये जत तालुक्यास सर्वाधिक 6 हजार 804 घरकुलांचा समावेश आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर गरीब, सर्वसामान्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान प्रधानमंत्री आवासमधून मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांनी किमान 90 दिवसांत घरकुल बांधकाम पूर्ण करुन घेण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.
sangli local news : सांगलीला प्रधानमंत्री आवासमधून तब्बल 27 हजार घरकुलं
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून 59 हजार लाभार्थी घरकुलांच्या प्रतिक्षेत आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये जिल्ह्यासाठी अवघे 5 हजार 248 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते.
त्यामुळे हजारो लाभार्थींना पुन्हा प्रतिक्षा करावी लागली होती. केंद्रात सलग तिसर्यांदा नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर सर्वांसाठी घर देण्याची धोरण जाहीर केले आहे. सर्वांसाठी घरे केंद्र शासनाच्या धोरणाअंतर्गत सांगली जिल्हयाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रं.2 अंतर्गत 27 हजार 459 ऐवढे अतिरिक्त उदिष्ट देण्यात आले आहे.
त्यामुळे मागील वर्षीचे आणि नव्याने आलेले मिळून 32 हजार 707 एवढे घरकुलांचे उदिष्ट सांगली जिल्हयास प्राप्त झाले आहे.
घरकुल मंजूरी प्रक्रिया जिल्हयात जोमात सुरु असून सर्व लाभार्थ्यांना एका घरकुल बांधकामाकरीता 1 लाख 20 हजार चार टप्प्यात जमा होतील. लाभार्थ्यांना टप्पानिहाय अनुदान थेट त्यांचे आधार लिंक असलेल्या खातेमध्ये जमा होते. सर्व मंजूर लाभार्थ्यांना लवकरच प्रथम हप्ता अदा करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांनी केलेल्या कामानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत नरेगाचे अनुदान 26 हजार 730 देण्यात येते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यास शौचालय बांधकामास 12 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
घरकुल बांधकामाकरिता स्व मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
परंतु जे लाभार्थी भूमिहीन आहेत, त्यांना पंडित दीनदयाळ खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 1 लाख रुपये देण्याची योजना आहे. महाआवास अभियान 2024-2025 च्या शासन निर्णयामधील नाविन्यपूर्ण उपक्रमानुसार महिला स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ, महिला, शेतकरी उत्पादक कंपनी इ. समुदाय आधारित संस्थाद्वारे जिल्हा परिषद गटामध्ये व ग्राम संघांतर्गत किमान एक घरकुल मार्ट सुरु करण्याबाबत तालुकास्तरावरुन कार्यवाही करण्यात येत आहे. याद्वारे घरकुल बांधकामाचे साहित्य जसे- दगड, विटा, वाळू, सिमेंट, दारे, खिडक्या, छताचे साहित्य इ. विक्रीसाठी उपलब्ध करुन देणेकरीता महिला संस्थांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
90 दिवसांत बांधकाम पूर्ण करा ः तृप्ती धोडमिसे
प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांनी किमान 90 दिवसांत घरकुल बांधकाम पूर्ण करुन घेण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी लाभार्थ्यास केले आहे.
तालुकानिहाय मंजूर घरकुलं
तालुका मंजूर
आटपाडी 2537
जत 6804
कडेगाव 2045
क. महांकाळ 2810
खानापूर 2330
मिरज 3861
पलूस 1629
शिराळा 3098
तासगाव 3400
वाळवा 4193

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



