rajkiyalive

SANGLI LOKSABHA : बालेकिल्ल्यांवरुन मांडली जात आहेत विजयाची गणिते

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : बालेकिल्ल्यांवरुन मांडली जात आहेत विजयाची गणिते : सांगली लोकसभेसाठी मतदार प्रक्रिया झाल्यानंतर आता विजयाच्या गणितांची आखणी उमेदवार व कार्यकर्ते करू लागली आहेत. प्रामुख्याने तिरंगी असणारी ही निवडणूक भाजपचे खासदार संजयकाका पाटील व काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात दुरंगी झाली आहे. खासदार पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य घेणार असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर विशाल पाटील हे मिरज व पलूस-कडेगाव

SANGLI LOKSABHA : बालेकिल्ल्यांवरुन मांडली जात आहेत विजयाची गणिते

मतदारसंघातून मताधिक्य घेतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी बालेकिल्ल्यांवरून विजयांच्या गणितांची आखणी सुरू केली आहे. सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 60.95 टक्के मतदान झाले. 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत चार टक्के मतदान कमी झाले आहे. मतमोजणी दि. 4 जूनला होणार आहे. त्यापूर्वी उमेदवार व समर्थकांनी मतांची मांडणी सुरू केली आहे.

खासदार संजयकाका पाटील दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी झाली होते.

2019 च्या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत झाली होती. खासदार संजयकाका पाटील दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी झाली होते. तर वंचित फॅक्टरचा इफेक्ट देखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झाला होता. आता 2024 च्या झालेल्या निवडणुकीत कोणाला कोणत्या मतदारसंघात किती मताधिक्य मिळणार याची चर्चा सुरू आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी 2019 मध्ये तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातून सर्वाधिक 46 हजार 949 इतके मताधिक्य घेतले होते.

त्यांचा हा बालेकिल्ला आहे. या भागातील जनतेने ‘खासदार व आमदार आपलाच’ हा नारा तालुक्यात दिला होता. माजी मंत्री अजितराव घोरपडे देखील त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे काकांना मताधिक्य मोठ्या प्रमाणात मिळाले. या मतदारसंघातून पुन्हा कामांना मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. तर खानापूर-आटपाडी या मतदारसंघातील असलेले विसापूर सर्कलमधील अनेक गावांत काकांचा संपर्क आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील मताधिक्य मिळेल.

विशाल पाटील समर्थकांनी यावेळी मिरज, सांगली व पलूस-कडेगाव या मतदारसंघातून मताधिक्य मिळेल, असा दावा केला आहे.

2019 मध्ये त्यांना 35 हजाराचे मताधिक्य या मतदारसंघातून होते. जत मतदारसंघाच्या दुष्काळी भागात पाणी पोहचवणेसह राष्ट्रीय महामार्गामुळे या मतदारसंघात देखील मताधिक्य मिळेल, असा काका समर्थकांचा दावा आहे.
गेल्यावेळी या मतदारसंघात 24 हजार मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे खासदारांना या तिन्ही मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळेल, असा दावा कार्यकर्ते व समर्थक करू लागले आहेत. तर दुसरीकडे विशाल पाटील समर्थकांनी यावेळी मिरज, सांगली व पलूस-कडेगाव या मतदारसंघातून मताधिक्य मिळेल, असा दावा केला आहे.

विशाल पाटील यांना 2019 च्या निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदारसंघातून केवळ 5 हजाराचे मताधिक्य मिळाले होते.

पण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने त्यांना मिरज, सांगली व पलूस-कडेगाव मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळेल, असे सांगत आहेत. सांगली व मिरज हे दोन विधानसभा मतदारसंघ विशाल पाटील यांच्यासाठी सोयीचे आहेत. पण या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून किती मताधिक्य मिळणार, याची चर्चा आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी आतून तर कार्यकर्त्यांनी उघड मदत केल्याने विशाल पाटील यांना या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळण्याची आशा आहे. या बरोबर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना पक्षाने उमेदवारी डावलल्याने या मतदारसंघातील अनेक भाजपचे कार्यकर्ते नाराज होते. याचा फायदा देखील विशाल पाटील यांना मिळण्याची आशा आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अनेक दुसर्‍या फळीतील नेत्यांनी विशाल पाटील यांना मदत केली आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळीपेक्षा यावेळी चांगली मते मिळतील, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी निश्चित बदल दिसेल.

सांगलीच्या अस्मितेची ही लढत झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिवाय जतमध्ये नाराजी असल्याने आघाडी मिळेल, असे कार्यकर्ते बोलत आहेत. खासदार संजयकाका पाटील यांची भिस्त तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी तर विशाल पाटील यांची भिस्त मिरज व पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघावर असणार आहे. या मतदारसंघातून उमेदवारांना मोठे मताधिक्य घ्यावे लागणार आहेत. तरच विजयापर्यंत पोहचू शकतात. कार्यकर्त्यांकडून आता मतांची आखणी सुरू आहे. मात्र हा केवळ अंदाज असणार आहे. चित्र तर 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.

2019 ला कोणाला कोठे मिळाले मताधिक्य?

खासदार संजयकाका पाटील यांना पलूस-कडेगाव मतदारसंघ वगळता पाचही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. त्यामध्ये तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 46 हजार 949, खानापूर-आटपाडीमधून 35 हजार 350, जतमधून 24,967, सांगलीमधून 20 हजार 832 व मिरज विधानसभा मतदारसंघातून 17,494 मताधिक्य मिळाले होते. केवळ पलूस-कडेगाव मतदारसंघातून विशाल पाटील यांना 5,308 इतके मताधिक्य मिळाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज