rajkiyalive

SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?

SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय? : पृथ्वीराज देशमुख : जिल्ह्यात माझे कुणाशीही वैर नसल्याने पाठबळ मिळेल

 

 

जनप्रवास : सांगली

SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?

भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून सात वर्षे काम करताना संघटनेची मजबूत बांधणी केली. सर्वांसोबत महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता आणली. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करीत असल्याने सांगलीतून लोकसभा निवडणुकीला इच्छुक असण्यात गैर काय, असा सवाल माजी आमदार पृथ्वीराज देशमुख केला. जिल्ह्यात माझे कुणाशीही वैर नाही, गटबाजी निर्माण करून बाहेरच्या पक्षांना कधीच मदत न केल्याने मला उमेदवारीसाठी पाठबळ मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपणही मैदान असल्याचे जाहीर केले

याद्वारे त्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपणही मैदान असल्याचे जाहीर केले. त्यासाठीच जिल्हाभर सर्वत्र समन्वयाने संपर्कदौरेही सुरू असल्याचे ते म्हणाले. देशमुख म्हणाले, मी जेथे असतो तेथे पक्षाशी एकनिष्ठ म्हणून काम करीत आलो आहे. मी आत एक-बाहेर एक कधीच केले नाही. त्याच आधारे गेली सात वर्षे मिळालेल्या संधीतून जिल्हाभर सर्वच नेत्यांसह कार्यकर्त्यांशी समन्वयाने बूथपासून गावपातळीवर भाजपची मजबूत बांधणी केली. माझे कधीच कोणाशी मतभेद झाले नाहीत. गटबाजीला थारा दिला नाही, पक्षात राहून इतर पक्षांना कधीच मदतीचा धंदा नाही.

 

महायुतीतील सर्व घटकांशी समन्वय आहे.

ते म्हणाले, माझे विलासराव जगतापांशी संबंध चांगले आहेत, आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याशीही चांगले संबंध आहेत. अजितराव घोरपडे सरकारांशीही समन्वय आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशीही मैत्रीचे संबंध आहेत. मी अध्यक्ष या नात्याने त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करून कोणालाच अडचण निर्माण केल्याचा प्रयत्न केला नाही. पक्षात कोणाला डावलले नाही. त्यामुळे माझ्या त्यांचे समर्थन मिळू शकते. शिवाय महायुतीतील सर्व घटकांशी समन्वय आहे.

हेही वाचा
भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

प्रत्यके लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रत्यके लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. त्यामुळेच भाजपमध्ये पक्षाला महत्त्व आहे व्यक्तीला नव्हे. मी पक्षाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षात कोणाच्याही उमेदवारीचा आता निर्णय झालेला नाही. त्यामुळ ेयोग्यवेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील मला मान्य राहील.

 

लोकसभेबाबत चर्चा 24 जानेवारीनंतर

देशमुख म्हणाले, भाजपचे सध्या फक्त 22 जानेवारीरोजी होणार्‍या अयोध्येतील राममंदिर उद्घाटन एकच लक्ष आहे. त्याचा देशभर उत्सव सुरू असून, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीबाबत आणि उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा नाही. ती 24 जानेवारीनंतर होईल असे वरिष्ठांनी संकेत दिले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज