rajkiyalive

SANGLI LOKSABHA : जयंत पाटील, विश्वजीत कदमांच्यात सेटलमेंट

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे राज्याचे नेते आहेत. तर माजी मंत्री विश्वजीत कदम काँग्रेसमधील मातब्बर नेते आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांना सांगलीत लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून सक्षम पर्याय देण्यात अपयश आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या सेटलमेंटच्या राजकारणामुळे जिल्ह्यात या दोघांव्यतिरिक्त तिसरे नेतृत्वच उभारु दिले जात नसल्याची टीका माजी आमदार व भाजप नेते विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

SANGLI LOKSABHA : जयंत पाटील, विश्वजीत कदमांच्यात सेटलमेंट

जिल्ह्यात तिसरे ‘नेतृत्व’च उभारु देत नाहीत – विलासराव जगताप

माजी आ. जगताप म्हणाले, जयंत पाटील व विश्वाजीत कदम हे दोन्ही नेते त्यांच्या पक्षात राज्याचे नेतृत्व करतात. दोघेही मातब्बर आहेत. पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातून सक्षम पर्याय देता आलेला नाही. ही त्यांची एकप्रकारे सेटलमेंटच असल्याची शोकांतिका आहे. पक्षातील नेते मोठे न करता त्यांना जास्तीत-जास्त कसा त्रास देता येईल हेच या दोघांकडून केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याशिवाय तिसरा पर्याय उभा राहिलेला नाही.

जयंतरावांनी केवळ स्वतःच्या मुलासाठी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्व्हे केला. परंतु दोन्हीकडे डाळ शिजत नसल्याचे लक्षात येताच निवडणुकीतून माघार घेतली. प्रसंगी या दोघांनी विरोधी पक्षातील उमेदवार, नेत्यांशी हातमिळवणी केली. परंतु स्वत:च्या पक्षात कुणालाही मोठे होवू दिले नाही. त्यांच्या या सेटलमेंटच्या राजकाणामुळे जिल्ह्याचे मात्र प्रचंड नुकसान झाले असल्याचे टीकास्त्र माजी आ. जगताप यांनी सोडले.

 

भाजपने सांगली लोकसभा मतदार संघात खा. संजय पाटील यांची उमेदवारी लादली आहे. सर्वे, पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक असताना, अनेक नेत्यांच्या त्यांना विरोध असताना पुन्हा त्यानाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षात अनेक नेते नाराज आहेत. विशषत: दुष्काळी फोरममधील नेत्यांत मोठी नाराजी असून लवकरच या नेत्यांची बैठक होणार आहे. यात पुढील निर्णय घेण्यात येईल. खा. पाटील यांना आमचा विरोध असणार आहे. कोणाला पाठींबा द्यायचा हे त्या बैठकीत ठरणार असून विरोधकांचा उमेदवार ठरला की ही बैठक होणार असल्याचे जगताप यांनी सांगीतले. पाटील यांनी रांजणी ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळ यासह अन्य कामे गेल्या दहा वर्षात मतदार संघात केली नाहीत.

आ. विक्रम सावंतांना संजयकाकांची मदत

माजी आ. जगताप म्हणाले, संजयकाकांच्यावर माझा व्यक्तिगत रोष नाही. पण त्यांचा इतिहास गद्दारीचा आहे. पक्षात राहून अन्य पक्षातील लोकांनाच त्यांनी नेहमी मदत केली. 2014 मध्ये मी त्यांच्या सोबत दिल्ली, नागपूर दौरे करत त्यांना साथ दिली. निवडून आणले होते. 2019 मध्येही मीच पुढाकार घेवून अन्य नेत्यांची नाराजी दूर करीत विजय सुकर केला. पण त्यांनी काय केले? जतमध्ये सतत माझ्या विरोधात काडया केल्या. विधानसभेला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांना साथ देत माझा पराभव केला. असे असेल तर आम्ही त्यांचा प्रचार का करू?, असा सवाल उपस्थित केला.

जगतापांनी वाचला संजय पाटलांच्या गद्दारीचा पाढाच…

विलासराव जगताप यांनी खा. संजयकाकांच्या गद्दारीचा पाढा वाचला. जिल्हा परिषदेत दोन्ही वेळी पदाधिकारी बदलात पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करत अपक्षाला सभापती केले. त्याच अपक्षाला जिल्हा नियोजन समितीवर पाठविले. सांगली महानगरपालिकेच्या महापौर निवडीत त्यांनी गद्दारी करीत भाजपच्या उमेदवाराला पाडले. सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही सेटलमेंट करुन भाजपचे पॅनेल पाडले.

निशिकांत पाटील यांनी घेतली माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट

भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेत शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची शिष्टाई असफल ठरली असून .माजी आमदार विलासराव जगताप आपल्या भूमिका ठाम असल्याची चर्चा आहे .खासदार संजय काका पाटील यांचे उमेदवारी जाहीर होताच खासदार संजयराव पाटील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. मात्र जत तालुक्यातून माजी आमदार विलासराव जगताप व त्यांच्या समर्थकांनी खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला असून. त्यांचा प्रचार करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे .

उमेदवार बदला या भूमिकेवर माजी आमदार विलासराव जगताप व त्यांचे समर्थक ठाम आहेत.

त्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली .या चर्चेदरम्यान माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून .खासदार संजय काका पाटील यांनी 2019 आली गद्दारी केली असून. माझ्या विरोधात त्यांनी प्रचार केले असल्याचे मत मांडले असून. त्यांनी पक्ष वाढावायचे सोडून जिल्ह्यात भाजप पक्षाच रसातळाला नेण्याचे काम केले असल्याचे विलासराव जगताप यांनी आपले मत मांडले आहे.

कोणत्याही परिस्थितीत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही

त्यांची उमेदवारी बदला अशी भूमिका ही त्यांनी मांडली असून. मी कोणत्याही परिस्थितीत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्ट भूमिका मांडली निशिकांत दादा यांच्या शिस्टाईला त्यांनी कात्रज चा घाट दाखवला आहे .त्यामुळे विलासराव जगताप यांच्या भूमिकेमुळे खासदार संजय काका पाटली यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दुष्काळी फोरम येणार एकत्र: खासदार संजय काका पाटलांच्या विरोधात दुष्काळी फोरम एकत्र येण्याची चर्चा आहे.

विलासराव जगताप यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील अनेक नेते खासदार संजय काका पाटील यांच्या वर नाराज असुन खासदार संजय काका पाटील यांना विरोध करणारा असल्याचे बोले जात आहे. पूर्वाश्रमीचे दुष्काळी फोरमचे नेते एकत्र येऊन मोट बाधंणार असल्याची चर्चा सुरू आहे.माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भुमीकेमुळे नाराज नेत्यांना बळ मिळाले असल्याचे बोले जात आहे.माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी पक्ष श्रेष्ठी दुर करणार काय याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज