rajkiyalive

SANGLI LOKSABHA : ना शिवसेना-ना राष्ट्रवादी, संजयकाका एकला चलो रे…

जनप्रवास । अनिल कदम
SANGLI LOKSABHA : ना शिवसेना-ना राष्ट्रवादी, संजयकाका एकला चलो रे… : सांगली ः सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत जागेचा तिढा सुरू असतानाच भाजपने आपली तिकीट जाहीर करून टाकले. भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देऊन पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्याचा फायदा घेण्याचा संजयकाकांचा प्रयत्न आहे. मात्र भाजपमधील अंतर्गत धुसफूस अद्यापही संपलेली नाही. भाजप महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहे. खासदारांनी मात्र ना शिवसेना ना राष्ट्रवादी सोबत घेत एकला चलो’ चा नारा देत प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे महायुतीमध्येही सारच काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचारासाठी पक्षातील नेते आणि घटक पक्ष कधी सहभागी होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

SANGLI LOKSABHA : ना शिवसेना-ना राष्ट्रवादी, संजयकाका एकला चलो रे…

भाजपमधील अंतर्गत धुसफूस कायम

सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. यावर्षी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपमधील काही नेते व पदाधिकार्यांनी केली होती. भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारीसाठी त्यांची दावेदारी होती. त्यांच्याबरोबर पक्षाने दीपक शिंदे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुधीर गाडगीळ या नेत्यांची नावे देखील लोकसभेला इच्छुकांमध्ये पाठविली होती. भाजप अंतर्गत असलेल्या नाराजीमुळे यावर्षी खासदार पाटील यांच्या जागी दुसर्या इच्छुकाला उमेदवारी मिळेल, अशी चर्चा गेल्या अडीच महिन्यांपासून रंगली होती. मात्र पक्षाकडून बुधवारी पुन्हा संजयकाका पाटील यांना तिसर्यांचा उमेदवारी देत भाजपने धक्का दिला.

खा. संजयकाका पाटील यांच्यापेक्षा ताकदीचा उमेदवार भाजपकडे नव्हता.

त्यामुळे पक्षातील अंतर्गत विरोध डावलून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत खासदार पाटील यांनी लोकसभेच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. त्यांच्या कार्यक्रमांचे निमंत्रण महायुतीतल्या घटक पक्षांना अद्याप मिळाले नसल्याने मानापमान नाट्य रंगले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख मित्रपक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी युतीधर्माचे पालन होईल, असे स्पष्ट केले असले तरी पक्षातील अन्य प्रमुख नेते, पदाधिकारी मात्र, ’बोलावणे आल्याशिवाय नाही’च्या भूमिकेवर ठाम आहेत. या कार्यक्रमात स्थानिक नेते, पदाधिकारी यांचा सहभाग दिसून येत असला तरी भाजपचे नेते, पदाधिकारी दिसत नाहीत.

महाविकास आघाडीत शिवसेना व काँग्रेस वा दोन्ही मित्रपक्षांची सांगलीच्या जागेसाठी रस्सीखेच रंगली आहे.

त्यामुळे त्यांच्यात स्पष्ट नाराजी दिसत आहे. निमंत्रण असूनही काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या सभेला गैरहजर राहिली होती. सांगलीच्या जागेबाबत महायुतीत कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष एकत्र प्रचारात दिसण्याला काही अडचण नव्हती. भाजपमध्ये अशी कोणतीही रस्सीखेच जागेवरून नसतानाही निमंत्रणामुळे तसेच मित्रपक्षांच्या शिष्टाचारामुळे नाराजीचा पहिला अंक सुरू सुरु झालेला दिसून येतो.

खासदार पाटील आणि भाजपमधील नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला वादही अद्याप शमलेला नाही.

सांगलीत खासदारांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाला माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्षांची गैरहजेरी होती. याशिवाय संजयकाकांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त करीत उघडपणे विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत संजयकाकांचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये सारेच काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.

भाजप पक्षांतर्गत सुरू असलेली नाराजी उघड झाली असतानाही महायुतीमधील घटक पक्ष ही नाराजी व्यक्त करीत आहेत.

प्रमुख नेते, पदाधिकार्‍यांमध्ये भाजपच्या दुर्लक्षाबाबत नाराजी आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना, पदाधिकार्‍यांना निमंत्रण द्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र भाजपकडून काहींना निमंत्रण मिळाले व काहींना मिळाले नाहीत. त्यामुळे छुप्या नाराजीनाट्याचा प्रयोग सुरू झाला आहे.

अद्याप बोलावणे नाही, पण लवकरच येईल

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी चांगली होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष म्हणून आम्ही भाजपच्या उमेदवाराचे काम करणार आहे. अद्याप भाजपकडून प्रचाराचे निमंत्रण नसले तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारात रंगत येईल. त्यामुळे मित्रपक्ष म्हणून आम्हांला बोलावल्यास आमचे उमेदवार म्हणून भाजपचा प्रचार केला जाईल.

प्रा. पद्माकर जगदाळे
शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज