rajkiyalive

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी

 

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी  रांजणीत ड्रायपोर्ट व्हावे, विमानतळासाठी पाठपुरावा करु 

 

 

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली : लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेवून निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. रांजणीतील ड्रायपोर्ट झाला पाहिजे, जिल्ह्यात फळबाग शेती वाढत असल्याने ड्रायपोर्टच्या अडचणी सोडविण्याची गरज आहे. याशिवाय जिल्ह्यात विमानतळ गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती.

माजी जिल्हाध्यक्ष देशमुख पुढे म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती. त्यावेळी मला थांबण्याची विनंती करीत पुढीलवेळी विचार करु, असे सांगण्यात आले होते. पक्षातील वरिष्ट नेत्यांचे आदेश मानून गतवेळी थांबलो. दावेदार असताना माघार घेवून पक्षाचे काम उमेदवाराच्या पुढे जावून केले होते. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी मी इच्छुक असून पक्षाकडे तिकीटाची मागणी केली आहे. सांगलीच्या जागेचा निर्णय घेताना जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेवून उमेदवारी दिली जाईल. पक्षात दबावाने तिकीट दिले जात नाही. त्यामुळे पक्षाकडून माझ्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

 

 

रांजणी येथे ड्रायपोर्ट झाला पाहिजे,

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांसाठी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन योजनांसाठी निधी दिला. सध्या जिल्हा 80 टक्के सुजलाम सुफलाम झाला आहे. जिल्ह्यातील उद्योगधंद्याची प्रगती झाल्याशिवाय प्रगतीला जोड मिळणार नसल्याचे चित्र आहे. उद्योग व्यवसाय वाढल्याशिवाय रोजगार वाढणार नाहीत. कवठेमहांकाळ, जत, खानापूर, तासगाव आणि आटपाडी तालुक्यात फळबागा वाढल्या आहेत. त्यामुळे ड्रायपोर्टची गरज आहे. रांजणी येथे ड्रायपोर्ट झाला पाहिजे, त्यामुळे शेतमालाची निर्यात होईल. ड्रायपोर्ट उभारणीमध्ये काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.

हेही वाचा
PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन
SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?
भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

शेतीला उद्योगाची जोड मिळाल्यास सांगली जिल्हा पहिल्या क्रमांकावर जाईल.

सांगलीतील औद्योगिक वसाहतीला बळ मिळाले नाही, त्यामुळे नवे उद्योग व्यवसाय सांगलीऐवजी कोल्हापूरकडे वळले. नॅशनल हायवेमुळे जिल्ह्याचा फायदा झाला आहे. त्याचा उपयोग भविष्यातील उद्योग वाढीसाठी झाला पाहिजे. राष्ट्रीय रस्त्यांचा उपयोग थेट सांगलीशी कनेक्टव्हिटी जोडण्यासाठी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

 

 

विमानतळ, ड्रायपोर्ट विकासाचे केंद्र

विमानतळ आणि ड्रायपोर्ट हे जिल्हयाच्या विकासाचे केंद्र आहे, त्यादृष्टीने कामे होणे गरजेचे होते, परंतु दोन्ही कामे झाली नसल्याबाबतची खंत माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केली. ड्रायपोर्ट आणि विमानतळामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. सांगलीतील विमानतळासाठी 160 एकर जागा उपलब्ध आहे, अद्याप 260 एकर जागा अधिग्रहण करणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हीटी वाढीसाठी दोन्हीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज