rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगली केसरीचं मैदान सेनाच मारणार

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः आत्तापर्यंत चंद्रहार पाटलांनी मॅटवरची कुस्ती केली पण, आता मातीतल्या माणूस अन् शेतकर्‍यांसाठी कुस्ती करण्याची वेळ आहे. देशातील हुकुमशाही, अराजकतेच्या विरोधात कुस्ती करु. डबल महाराष्ट्र केसरी झाला तसेच येणार्‍या मैदानात सांगली केसरीही निश्चित होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी दीड महिना राग बाहेर काढुन, भाजपचा पराभव करण्यासाठी तयार राहावे अशा सूचना शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी दिल्या.

SANGLI LOKSABHA : सांगली केसरीचं मैदान सेनाच मारणार

नितीन बानुगडे-पाटील, सेनेच्या पदाधिकार्‍यांचा बैठक

येथील फल्ले मंगल कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा संपर्कप्रमुख प्रा बानगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, चंद्रहार पाटील बजरंग पाटील, दिगंबर जाधव, महिला आघाडीच्या आशाताई पोतदार उपस्थित होते.

बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, पूर्वी लोक पळवायचे आता तर हे पक्ष पळवत आहेत. आता जनताच परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, नेते विकले गेले तर जनताच हातात निवडणुका घेतील. आता हीच परिस्थिती आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे आपल्याला नियोजनाने पुढे गेले पाहिजे. आता राउंडवर नाही तर ग्राउंडवर काम केलं पाहिजे. निवडणुकीच्या यशासाठी कामाला लागले पाहिजे.

महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. काय असेल ते वरिष्ठ पातळीवर बघून घेतील. आपण तयारीला लागायचे आहे. आपली सुरवात चांगली असून शिवसेनेचा भगवा फडकवणारच. परिवर्तनाची लढाई आता सांगली जिल्ह्यातून परिवर्तन करू. सांगली जिल्ह्यातील तरुण पुणे मुंबईसारख्या शहरात रोजगारासाठी जात आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे नुसत्या घोषणा पोकळ आश्वासन आहे. पण स्थिती बिकट आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले, एका शेतकर्‍यांच्या मुलावर पक्षाने जबाबदारी टाकली हे फक्त शिवसेनाच करू शकते. माझ्या मागे पक्ष नव्हता, साखर कारखाना नाही, कोणतीही ताकद नसताना मला निवडले. बैलगाड्या शर्यती घेऊन मतदान पडते का असे लोक म्हणत आहेत पण मी कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय मी राहत नाही.

यावेळी सिद्धार्थ जाधव, सुभाष मोहिते, मारुती मगर, दादा भगत, वीरू फाळके, चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम, केदार गुरव, तानाजी सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वजीत, विशाल पाटील म्हटले तरी सांगली सेनेलाच ….

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे नेते विश्वजित कदम, विशाल पाटील हे सांगतायत की सांगली मतदारसंघ काँग्रेसला सुटणार आहे. पण मला पक्षाने सांगितलंय की शांत बसा. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मदतीने शिवसेना जिंकेल, असा विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज