rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीतून ठाकरे सेनेचे पै. चंद्रहार उमेदवार

जनप्रवास  मुंबई  

SANGLI LOKSABHA : सांगलीतून ठाकरे सेनेचे पै. चंद्रहार उमेदवार : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज (सोमवार) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना दिल्लीत पाठवू, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीची घोषणाच केली. चंद्रहार यांच्या उमेदवारीने उमेदवारीच्या घोळात अडकलेल्या महायुतीची चिंता मात्र वाढली आहे. दुसरीकडे काँग्रेसलाच सांगलीतून उमेदवारी मिळणार आणि विशाल पाटील निवडणूक रिंगणात असणार अशा कल्पनेत असणारी काँग्रेस मात्र संभ्रमात पडली आहे.

SANGLI LOKSABHA : सांगलीतून ठाकरे सेनेचे पै. चंद्रहार उमेदवार

उध्दव ठाकरेंच्या शिवबंधन बांधले, महायुतीची चिंता वाढली : काँग्रेसमध्ये संभ्रम

मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज (सोमवार) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना दिल्लीत पाठवू, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीची घोषणाच केली. चंद्रहार यांच्या उमेदवारीने उमेदवारीच्या घोळात अडकलेल्या महायुतीची चिंता मात्र वाढली आहे. दुसरीकडे काँग्रेसलाच सांगलीतून
उमेदवारी मिळणार आणि विशाल पाटील निवडणूक रिंगणात असणार अशा कल्पनेत असणारी काँग्रेस मात्र संभ्रमात पडली आहे.

पै. चंद्रहार यांच्या नावाची घोषणा ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरणच बदलून गेले आहे.

स्वच्छ चारित्र्याच्या पै. चंद्रहार पाटलांवर भ्रष्टाचाराचा कोणताही ठपका नाही. त्यातच तोच तोच चेहरा पाहून कंटाळलेले मतदार भाजपने जर संजय पाटील यांना उमेदवारी दिलीच तर भाजपच्या बाजुने जाणार नाहीत असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे.
खा. संजय पाटलांबद्दल नाराजी कायम

खा. संजय पाटलांबद्दल यावेळी मात्र प्रचंड नाराजी आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विजयी झालेल्या खा. संजय पाटलांबद्दल यावेळी मात्र प्रचंड नाराजी आहे. महायुतीत कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबद्दल मतभिन्नता असली तरी सांगलीची जागा ही भाजपच लढविणार हे निश्चित आहे. दोनवेळा विजयी झालेल्या खा. संजय पाटलांबद्दल मात्र पक्षांतर्गत तसेच मतदारांमध्येदेखील प्रचंड नाराजी आहे. माजी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे गेल्या चार महिन्यांपासून तयारीला लागलेले आहेत.

आ. सुधीर गाडगीळ, दीपकबाबा शिंदे यांची नावेदेखील चर्चेत

पक्षाकडून न्याय मिळेल असे सांगत त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवित दावा सांगीतला आहे. याबरोबरच आ. सुधीर गाडगीळ, दीपकबाबा शिंदे यांची नावेदेखील चर्चेत आहेत. भाजप विरोधकांच्या मते संजय पाटील यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. संजय पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात असलेल्या नाराजीबाबत भाजपच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना अवगत केले आहे. याचा फायदा पै. चंद्रहार पाटील यांना होऊ शकतो.

पै. चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत . आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धवम बाळासाहेब ठाकरे गटानेही कंबर कसली आहे. आता चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिवसेना उबाठा गटाला सांगलीत खंदा उमेदवार मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सोमवारी पक्षप्रवेश पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्याविरुद्ध लढण्याची कुणाची छाती होणार नाही. पक्षातून पळपुटे नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत.शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. मी लहान असताना मारुती माने साहेब घरी यायचे, बाळासाहेबांना भेटायचे ते दिवस आठवतात. तीच परंपरा आजदेखील कायम आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी पक्षात आले. ’अबकी बार चंद्रहार’ पण फक्त घोषणा देऊन चालणार नाही, सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल.

गदा आणि मशाल मर्दाच्या हातात शोभतात

लोकांनी ठरवलंच आहे, त्याला मी काय संकेत देणार. जनतेनं एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे. गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात. हीच गदा आणि मशाल घेऊन आपल्याला एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. लवकरच सांगलीत येणार, पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारांना आडवं करायचं आहे. हुकूमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे तरणेबांड मर्द पहिलवान शिवसेनेत आले आहेत आणि भविष्य तुमच्या हातात आहे. जनता आपल्याकडे अपेक्षेनं बघते आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

अब की बार ’चंद्रहार’

यावेळी खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, डबल ’महाराष्ट्र केसरी’ महाराष्ट्राच्या वैभवाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी कुस्तीचं मैदान गाजवलं आहे. ते कुस्ती क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहेत. हे खासदारकी लढायला आले आहेत. चंद्रहार ठाकरे सेनेमध्येे सामील झाले. शिवसेनेच्या मशालीसोबत चंद्रहारची गदा असणार आहे. ‘अब की बार ’चंद्रहार’ ही तुमची घोषणा आहे. चंद्रहारला जिथे पाठवायचा आहे, तिथे पाठवणारच. त्याला आता कुणी रोखू शकत नाही, असंही राऊतांनी म्हटलं

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज