rajkiyalive

SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य

अकरा गावात पाकीट तर तीन गावात कमळाला मताधिक्य

जनप्रवास । सांगली

SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य: सांगली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यामध्ये सर्वाधिक आघाडी ही शहरातून मिळाली आहे. तब्बल 11 हजार मतांची शहरातून तर ग्रामीण भागातून आठ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. मतदारसंघातील माधवनगर, बिसूर, बुधगाव, नांद्रेसह अकरा गावात पाकिटाला साथ मिळाली. तर बामणोली, हरिपूर व अंकलीमध्ये भाजपला अल्प मताधिक्य मिळाले. तर सांगली शहर, कुपवाड, सांगलीवाडी, वानलेसवाडीमध्ये देखील विशाल पाटील यांचा करिष्मा चालला.

SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य

SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य: सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विशाल पाटील तब्बल एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीत सर्वात चर्चेचा राहिलेला सांगली विधानसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघात भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना 1 लाख 5 हजार 185 मते मिळाली. तर भाजपचे संजयकाका पाटील यांना 85 हजार 993 व शिवसेना (उबाठा) गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना 7 हजार 156 मते मिळाली. या मतदारसंघातून विशाल पाटील यांना तब्बल 19 हजार 192 मताधिक्य मिळाले आणि त्यांचा विजय आणखी सोपा झाला.

SANGLI LOKSABHA : शहरात 11 हजार तर ग्रामीणमध्ये 8 हजाराचे विशाल पाटलांना मताधिक्य : या मतदारसंघातील इनामधामणी, जुनी धामणी, कर्नाळ, नांद्रे, नावरसवाडी, बुधगाव, कावजी खोतवाडी, वाजेगाव, बिसूर, माधवनगर व पद्माळे या गावातून विशाल पाटील यांनी 8 हजार 512 मतांची आघाडी घेतली. तर संजयकाका पाटील यांना बामणोली, हरिपूर व अंकली या गावातून केवळ 470 मतांची आघाडी मिळाली. तर सांगली विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात येत असलेल्या सांगलीवाडी, वानलेवाडी, कुपवाड शहरात देखील विशाल पाटील यांनी आघाडी घेतली. कुपवाडमध्ये 2 हजार 254, सांगलीवाडीत 870, वान्लेसवाडीत 682 मतांची विशाल पाटील यांनी आघाडी घेतली. सांगली शहरातील इतर भागात देखील विशाल पाटील यांचा करिश्मा चालला. त्यांनी सुमारे 7 हजार 882 मताधिक्य सांगली शहरातून घेतले.

खणभाग, नळभाग, शंभरफुटी परिसर, संजयनगर, कारखाना परिसर, नवीन वसाहत, सिध्दार्थ परिसर, गवळी गल्ली यासह मुस्लिम व मागासवर्गीय मतदार असलेल्या बूथवर विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. तर संजयकाका पाटील यांना विश्रामबाग परिसर, धामणी रोड, गव्हर्मेंट कॉलनी, नेमीनाथनगर, रतनशीनगर, गावभाग, जामवाडीसह भाजप मतदार असलेल्या भागातून काही प्रमाणात मताधिक्य मिळाले. पण सांगली शहरातील अनेक बूथवर विशाल पाटील आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

गावनिहाय पडलेली उमेदवारांना मते-

कर्नाळ- विशाल पाटील- 2294, संजयकाका पाटील 1148, चंद्रहार पाटील 118. नांद्रे- विशाल पाटील- 3357, संजयकाका पाटील 2215, चंद्रहार पाटील 195. नावरसवाडी विशाल पाटील- 206, संजयकाका पाटील 117, चंद्रहार पाटील 2. बुधगाव- विशाल पाटील- 4326, संजयकाका पाटील 2581, चंद्रहार पाटील 432. कावजी खोतवाडी- विशाल पाटील- 727, संजयकाका पाटील 181, चंद्रहार पाटील 178. वाजेगाव- विशाल पाटील- 122, संजयकाका पाटील 59, चंद्रहार पाटील 10. बिसूर विशाल पाटील- 2400, संजयकाका पाटील 656, चंद्रहार पाटील 64.

माधवनगर- विशाल पाटील- 3025, संजयकाका पाटील 2585, चंद्रहार पाटील 325. बामणोली- विशाल पाटील- 1399, संजयकाका पाटील 1516, चंद्रहार पाटील 235. पद्माळे- विशाल पाटील- 1476, संजयकाका पाटील 319, चंद्रहार पाटील 21. हरिपूर- विशाल पाटील- 2186, संजयकाका पाटील 2430, चंद्रहार पाटील 160. अंकली- विशाल पाटील- 900, संजयकाका पाटील 1009, चंद्रहार पाटील 91. इनामधामणी- विशाल पाटील- 1465, संजयकाका पाटील 1030, चंद्रहार पाटील 90. जुनी धामणी- विशाल पाटील- 283, संजयकाका पाटील 278, चंद्रहार पाटील 119.

कुपवाड- विशाल पाटील- 13791, संजयकाका पाटील 11537, चंद्रहार पाटील 1125. वान्लेसवाडी- विशाल पाटील- 2124, संजयकाका पाटील 1442, चंद्रहार पाटील 149. सांगलीवाडी- विशाल पाटील- 4864, संजयकाका पाटील 3994, चंद्रहार पाटील 280.

शहरी भागात कशी आहे स्थिती.?

सांगली विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने सांगली शहर, कुपवाड, वानलेवाडी व सांगलीवाडी हे प्रमुख भाग येतात. या सर्व ठिकाणाहून विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. सांगली शहरातून तब्बल 7 हजार 882 तर कुपवाड शहरातून 2 हजार 254, वानलेसवाडी येथून 682 व सांगलीवाडी येथून 870 मताधिक्य मिळाले असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात कशी आहे स्थिती.?

सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये बुधगाव येथून सर्वाधिक 1 हजार 745 मताधिक्य विशाल पाटील यांना मिळाले आहे. तर बिसूरमधून 1 हजार 744, पद्माळे 1 हजार 157, कर्नाळ 1 हजार 146, नांद्रे 1 हजार 142, कावजी खोतवाडी 546, इनामधामणी 435, माधवनगर 440, नावरसवाडी 89, वाजेगाव 63 तर जुनी धामणीमधून विशाल पाटील यांना 5 मताधिक्य मिळाले. संजयकाका पाटील यांना हरिपुरमधून 244, बामणोलीमधून 117 तर अंकलीमधून 109 मताधिक्य मिळाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज