rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीत ‘विशाल’ की शिवसेनेची ‘मशाल’: आज फैसला

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीत ‘विशाल’ की शिवसेनेची ‘मशाल’: आज फैसला : महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेना (उबाठा) मध्ये चढाओढ सुरू आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस जागा सोडण्यास तयार नाही. तर दुसरीकडे शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे संघर्ष वाढला आहे. महाविकास आघाडीचे नेते एकत्रित मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर उमेदवारी जाहीर करणार आहे. त्यामुळे सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळते की शिवसेनेचे चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, याचा फैसला मंगळवारी होणार आहे.

 

SANGLI LOKSABHA : सांगलीत ‘विशाल’ की शिवसेनेची ‘मशाल’: आज फैसला

सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण गेल्या दहा वर्षात खा. संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे सांगलीवर जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने दावा सांगितला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना होता. मात्र या ठिकाणी शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी सेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला ते हात चिन्हावर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसने पहिल्या यादीत कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावाची घोषणा देखील केली.

यामुळे शिवसेनेने सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम, इच्छूक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून शिवसेनेच्या विरोधात तकारी केल्या.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सांगलीची जागा सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली.

याला प्रदेश व केंद्रीय पातळीवर नेत्यांनी होकार दिला. सांगलीची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगलीची जागा सोडणार नसल्याचे सांगितले. या वादाच्या काळातच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी तीन दिवस सांगलीचा दौरा केला. या दौर्‍यात त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. उलट त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लक्ष केले. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी खा. संजय राऊत यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. महाविकास आघाडीमध्ये दुरी निर्माण झाली. तरी देखील खा. संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेवरील हट्ट सोडला नाही.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक आहे.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील 48 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत वाद सुरू आहे. काँग्रेस व शिवसेनेने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी मिळणार की शिवसेनेचे चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज