rajkiyalive

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील यांनी केले अर्ज दाखल: आज जोरदार शक्तीप्रदर्शन

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : विशाल पाटील यांनी केले अर्ज दाखल: आज जोरदार शक्तीप्रदर्शन महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून इच्छूक असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज दाखले केले. दरम्यान, मंगळवारी विशाल पाटील सांगलीत शक्तीप्रदर्शन करणार असून आणखी एक अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचे चित्र आहे.

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील यांनी केले अर्ज दाखल: आज जोरदार शक्तीप्रदर्शन

सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी सातत्याने स्थानिक नेते आग्रह धरत होते. परंतू महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली आहे. महाविकास आघाडी सांगलीबाबतचा निर्णय बदलेल, अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे. परंतू तत्पूर्वी विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाकडून एक तर दुसरा अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.

सोमवारी मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

परंतु मंगळवारी सांगलीत शक्तिप्रदर्शन करत आणखी एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मंगळवारी काँग्रेस सांगलीत मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहे. यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरतील जो काँग्रेसकडून असेल. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या आशेवरही नेते आहे. दरम्यान सतिश कृष्णा कदम यांनी हिंदुस्थान जनता पार्टीच्यावतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला.

 सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे,

तत्पूर्वी आज खरसुंडी येथे आमचे कुलदैवत सिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठीशी राहिली आहे. येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे असं त्यांनी सांगितले.

सांगलीत शक्तीप्रदर्शन; शहरात रॅली

काँग्रेसचे विशाल पाटील मंगळवारी शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी सांगली शहरातून रॅली काढणार आहेत. सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात होणार आहे. तेथून सराफ कट्टा, कापडपेठ, तानाजी चौक, पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौकमार्गे काँग्रेस कमिटीसमोर रॅली येणार आहे. तेथे कार्यकर्त्यांची सभा होईल.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज