rajkiyalive

SANGLI MAHAMARG : सांगली-पेठ रस्त्यामुळे मिळणार सांगलीच्या विकासाला चालना

SANGLI MAHAMARG : सांगली-पेठ रस्त्यामुळे मिळणार सांगलीच्या विकासाला चालनागुणवत्तेचा तातडीने चौपदरीकरण रस्ता होणे आवश्यक

SANGLI MAHAMARG : सांगली-पेठ रस्त्यामुळे मिळणार सांगलीच्या विकासाला चालना

 

जनप्रवास । सांगली

सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामासाठी 860 कोटींचा खर्च अपेक्षित असून ठेकेदाराने निम्या दराने निविदा भरली आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला हा मार्ग जोडला जाणार असल्याने वाहतूक जलद होणार आहे. त्यामुळे सांगलीतील हळद, बेदाणे, द्राक्ष आदी शेतीमालाला चालना मिळणार आहे. एमआयडीसीमधील उद्योगधंद्यांना देखील चालना मिळणार आहे. हे गुणवत्तापूर्ण काम तातडीने झाल्यास सांगलीच्या विकासाला चालना मिळणार आहे.

सांगली शहरापासून राष्ट्रीय महामार्ग दूर असल्याने सांगलीच्या आवश्यक इतक्या विकासाला चालना मिळाली नाही.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाशी सांगली जोडणे आवश्यक आहे. सध्या रत्नागिरी-नागपूर महामार्ग देखील सांगलीपासून चार किलोमिटर अंतरावरून गेला आहे. त्यामुळे सांगली-पेठ रस्ता हा चारपदरी होणे अपेक्षित होते. जिल्ह्यातील मातब्बर नेते राज्याच्या राजकारणात असूनही ही मागणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या खड्डेमय रस्त्यातून पुणे, मुंबईचा प्रवास करावा लागत होता. सांगलीतून पेठला पोहचण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. पावसाळ्यात या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडत होते. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले, अनेकांचे बळी देखील गेले. या रस्त्याविरोधात आंदोलन झाले की तात्पुरती मलमपट्टी म्हणून पॅचवर्क केले जात होते.

 

हा रस्ता चौपदरीकरणासाठी या विरोधात नागरिक हक्क संघटनेसह अनेकांनी आंदोलने केले.

पूर्वी हा मार्ग राज्य शासनाकडे होता. आंदोलनाची दखल घेत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्यावर्षी या रस्त्याच्या कामासाठी 860 कोटींचा निधी मंजूर केला. ईपीसी तत्वावर या रस्त्याचे काँक्रीटीकरण, चौपदरीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसविण्यात येणार आहे. छोटे पुल, ट्रक थांबे, बसशेड, मोठे जंक्शन यासह काही भागात दोन्ही बाजुला गटारी करण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया झाली. 860 कोटींची निविदा राजस्थानच्या आरएसबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 48 टक्के कमी दराने भरली होती. त्यांना हे काम मंजूर झाले आहे. प्रत्यक्षात आता कामाला सुरूवात झाली आहे.

अद्याप पूर्ण क्षमतेने काम सुरू झाले नाही. मात्र या महिन्यात कंपनीची सर्व यंत्रणा या कामासाठी असणार आहे. त्यामुळे दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सांगली-पेठ अंतर 30 ते 40 मिनिटात शक्य होणार आहे. त्यामुळे वाहतूक जलद व इंधन खर्चात देखील बचत होणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग शेतीवर आधारीत व्यवसाय तसेच एमआयडीसीमधील व्यवसायिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. महामार्ग सभोवतालचा परिसर व शहराच्या विकास व परिसराला चालना मिळणार आहे.

 

असा होणार सांगली- पुणे रस्ता

* सांगलीवाडी ते पेठ 41 किलोमिटरचा काँक्रीटीकरण रस्ता.
* रस्त्यासाठी 860 कोटी मंजूर. * रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक. * 14 कि. मी. काँक्रीट गटार तर 27 कि.मी.ची दोन्ही बाजुस खुली गटार. * दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड. * दहा मोठे तर 34 लहान जंक्शन.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज