rajkiyalive

sangli mahanagarpalika news : महापालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात : उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी घेतली हजाराची लाच.

सांगली :

sangli mahanagarpalika news : महापालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात : उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी घेतली हजाराची लाच. : मालमत्ता असेसमेंट उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजारांची लाच घेणार्‍या कुपवाड येथील महापालिकेच्या दोघा कर्मचार्‍यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कनिष्ठ लिपीक इम्रान अब्दुल रहमान देसाई (वय 35, रा. उदगाव वेस, झेंडे महाराज मठाजवळ, मिरज ) आणि शिपाई राजेश संजीवन मोरे (वय 52, रा. मोरे बिल्डिंग, महादेव मंदिराच्या पाठीमागे, चंदनवाडी, मिरज ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने सदरची कारवाई केली.

sangli mahanagarpalika news : महापालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात : उतार्‍यावर नावाची नोंद करण्यासाठी घेतली हजाराची लाच.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती. त्याची असेसमेंट उतार्‍यावरील त्यांच्या काकांचे नाव कमी करुन स्वत:च्या नावाची नोंद होवून घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे 1 हजारची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. सदर तक्रारीची शहानिशा केली असता यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले. लिपीक देसाई यांना लाच देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचे सिध्द झाले.

पोलीस निरिक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला.

यानंतर मंगळवार दि. 6 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी दोघा संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन एक हजारची रक्कम स्विकारताना पथकातील अधिकार्‍यांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज