rajkiyalive

sangli mahapalika news : मनपा क्षेत्रातील वृक्षांचा तयार होतोय बायोडाटा, वय, उंची, स्थिती, घेर्‍यासह इतर माहिती होत आहे संकलन

सांगलीवाडीतून सुरूवात:

sangli mahapalika news : मनपा क्षेत्रातील वृक्षांचा तयार होतोय बायोडाटा, वय, उंची, स्थिती, घेर्‍यासह इतर माहिती होत आहे संकलन : महापालिका क्षेत्रातील वृक्षांची डिजीटल गणना सुरू झाली आहे. सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक तेरामधून याचे काम सुरू झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. या सर्वेक्षणात वृक्षांचे मनपाकडे जिओ टॅगिंग केले जात आहे. या शिवाय वृक्षाचे नाव, प्रजात, उंची, वय, स्थिती, घेरा, धोकायदायक आहे का? अशा बाबींचा बायोडाटा तयार केला जात आहे.

sangli mahapalika news : मनपा क्षेत्रातील वृक्षांचा तयार होतोय बायोडाटा, वय, उंची, स्थिती, घेर्‍यासह इतर माहिती होत आहे संकलन

पर्यावरणाच्या दृष्टीने शहरी क्षेत्राच्या एकूण 33 टक्के क्षेत्रांवर झाडे असतील, तरच प्रदूषण कमी होऊ शकते. पण सध्या सात ते आठ टक्क्यांवर वृक्ष असल्याचे पर्यावरणप्रेमींचा अंदाज आहे. त्यामुळे वृक्षांची गणना आवश्यक असते. महापालिका क्षेत्रात दहा लाख झाडे असतील, असा अंदाज विभागातून व्यक्त करण्यात आला. पण वृक्षांचा नेमका आकडा, कोणत्या प्रजातींचे किती वृक्ष, हे काही सांगता आले नाहीत. त्यामुळे वृक्षांची जनगणना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेने दोन कोटींची तरतूद देखील केली आहे. गेल्या महिन्यात निविदा काढण्यात आली. मुंबईच्या एका कंपनीला याची निविदा अंतिम झाली. वर्क ऑर्डर देऊन आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते वृक्ष जनगणनेला सुरूवात करण्यात आली.

प्रत्येक झाडाला वीस रूपये प्रमाणे कंपनीला मनपा पैसे अदा करणार आहे. कंपनीकडून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये सॉफ्टवेअर व डॅशबोर्डचा अंतर्भाव आहे. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक झाड, सार्वजनिक जागा, मोकळ्या जागा, औद्योगिक परिसर इतकेच नव्हे तर खासगी मालमत्तेतील प्रत्येक झाडांची गणना करून रेकॉर्ड जतन केले जात आहे. 50 वर्षांहून जास्त जुन्या वृक्षांची म्हणजेच हेरीटेज वृक्षांची गणना होत आहे. या शिवाय झाडांची उंची, खोडाचा घेर, झाडाचे नाव, देशी आहे की परदेशी, झाडांवर वीज कंपनी अथवा कोणती वायर गेली आहे काय? याबाबतची सर्व माहिती कंपनीकडून एकत्रित केली जात आहे.

सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक तेरामधून सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कंपनीचे 75 कर्मचारी काम करत आहेत. सर्व माहिती मनपा नागरिकांना देखील उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे काम गतीने सुरू आहे. चार महिन्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्व वृक्षांचा डाटा मनपाकडे संकलित होणार आहे. भविष्यात वृक्ष लागवड करण्यासाठी आवश्यक जागा देखील कंपनीकडून शोधून दिली जाणार आहे.

हरित क्षेत्र विकसीतसाठी वृक्षगणना: गिरीष पाठक

शहरातील सर्व वृक्षांची ऑनलाईन माहिती कंपनीकडून घेतली जात आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात किती टक्के क्षेत्रांवर वृक्ष आहेत. याची माहिती मिळेल. वृक्षगणनेमुळे मनपा क्षेत्रातील वृक्षांच्या विविध प्रजातीची माहिती देखील मिळेल. वृक्षांचा सर्व डाटा मनपाकडे संकलित होणार आहे. नागरिकांना देखील हा डाटा पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे उद्यान अधीक्षक गिरीष पाठक यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज