rajkiyalive

sangli mahapalika news : महापालिका क्षेत्रात 2027 मध्ये थेट पाईपमधून घरात नैसर्गिक गॅस

तीन टप्प्यात काम, 50 हजार घरे; डिसेंबर अखेर 900 घरांना गॅस

जनप्रवास । प्रतिनिधी ं

sangli mahapalika news : महापालिका क्षेत्रात 2027 मध्ये थेट पाईपमधून घरात नैसर्गिक गॅस :महापालिका क्षेत्रातील सुमारे 50 हजारांहून अधिक घरांमध्ये 2027 मध्ये स्वयंपाकासाठी नैसर्गिक गॅस मिळणार आहे. त्यासाठी मनपाच्या प्रभागनिहाय तीन टप्प्यांमध्ये पाईपलाईनचे काम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम वानलेसवाडी, विश्रामबाग परिसरात सुरू आहे. मात्र पावसाळ्यात खोदाईचे काम बंद आहे. पावसाळ्यानंतर कामाला गती येणार असून डिसेंबरअखेर 900 घरांना नैसर्गिक गॅस मिळण्याची शक्यता आहे.

sangli mahapalika news : महापालिका क्षेत्रात 2027 मध्ये थेट पाईपमधून घरात नैसर्गिक गॅस

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाव्दारे सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील 50 हजारांहून अधिक घरांच्या स्वयंपाक खोलीत पाईपव्दारे नैसर्गिक गॅस पोहचणार आहे. घराच्या चारही भिंती व छत पत्र्याचा आहेत. त्यांना नैसर्गिक गॅस जोडणी मिळणार नाही. इतर घरांना सहज जोडणी मिळणार आहे. महापालिका क्षेत्रात एकूण वीस प्रभाग आहेत. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 17 व 19 या पाच प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागांमध्ये पाचशे किलोमिटर एमडीपी पाईपलाईन होणार आहे. वानलेसवाडी, विजयनगर, विश्रामबाग परिसरातील दोनशे घरे व पाच प्रभागातील 700 घरांना अशा 900 घरांना डिसेंबरअखेर गॅसपुरवठा होणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 7, 14, 15, 16, 18 या नऊ प्रभागांमध्ये आणि तिसर्‍या टप्प्यात प्रभाग क्रमांक 5, 6, 11, 12, 13 व 20 या प्रभागात पाईपलाईन टाकली जाणार आहे. तिसर्‍या टप्प्यात 6 प्रभागांमध्ये पाईपलाईन टाकली जाणार आहे.

महापालिकेने खुदाई परवान्याबाबत कंपनीला पावसाळ्यानंतर काम सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना देखील दिल्या आहेत. पावसाळ्यानंतर ही खोदाईचे काम सुरू होणार आहेत. मनपा क्षेत्रातील 50 हजारांहून अधिक घरांना पाईपव्दारे नॅचरल गॅसपुरवठा करण्याचे उदिष्ट आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यास अडीच वर्षे लागणार आहेत. पण जसे काम पूर्ण होईल, तसे घरांना पाईपव्दारे गॅसपुरवठा होणार आहे. पण मनपा क्षेत्रात पूर्णपणे काम होण्यास 2027 उजाडणार आहे.

या गॅसमुळे नागरिकांचा फायदा होणार आहे. सध्या होत असलेली गॅस टाक्यांची कटकट आता संपणार आहे. टाकीमधील गॅस संपल्यानंतर जादा टाकी भरलेली असेल तर नागरिकांची सोय होत होती. पण टाकी भरलेली नसली की नागरिकांची गैरसोय होत होती. पण आता ही कटकट मिटणार आहे. नागरिकांना अखंडित गॅसचा पुरवठा होणार आहे.

यामध्ये कोणतीही टंचाई जाणवणार नाही. एलपीजीपेक्षा हवेबरोबर ज्वलनशीलतेची मर्यादा अधिक आहे. शिवाय प्रदूषण देखील कमी होणार आहे. नॅचरल गॅस स्वच्छ, ज्वलन होताना निळी ज्योत, भांडी काळी होण्याचा धोका आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा नागरिकांना होणार आहे.

नॅचरल गॅसचा असा होणार पुरवठा…

दाभोळ ते बंगळूर ही नॅचरल गॅस पाईपलाईन कोल्हापुरमधील मौजेे वडगाव येथे गेली आहे. मौजे वडगाव येथील सिटीगेट स्टेशनमधून वाघवाडी फाटा, इस्लामपूर, आष्टा, तुंगमार्गे सांगलीला पाईपव्दारे गॅस येणार आहे. वाघवाडी फाटा, इस्लामपूरमार्गे सांगलीला गॅस पाईपलाईन आली आहे. सांगली-इस्लामपूर मार्गावरील काही ठिकाणचे काम झाल्यानंतर डिसेंबरअखेर या पाईपमधून सांगलीला गॅस येणार आहे.

 

एलपीजीपेक्षा नैसर्गिक वायू स्वस्त, सुरक्षित…

एलपीजीच्या तुलनेत नैसर्गिक वायू खूपच स्वस्त, सुरक्षित आणि हिरवा आहे. हे एलपीजीपेक्षा सुरक्षित आहे कारण ते हवेपेक्षा हलके आहे आणि त्यामुळे ते गळते तेव्हा वर येते, ज्यामुळे जमिनीच्या पातळीवरील आगीच्या आपत्तींची शक्यता कमी होते. तसेच पाईपव्दारे नॅचरल गॅसपुरवठा करण्यासाठी वीज लागत नाही, गॅसच्या प्रेशरवर हे नेटवर्क चालते. ज्या भागात गॅसच्या प्रेशरमध्ये फरक पडेल, तिथे तत्काळ गॅसपुरवठा थांबेल. शिवाय आपत्कालिन कक्ष 24 तास कार्यरत असणार आहे.

 

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज