rajkiyalive

SANGLI MAHAPALIKA : प्रतापसिंह उद्यानात आता पक्षांचा किलबिलाट

जनप्रवास । सांगली

SANGLI MAHAPALIKA : प्रतापसिंह उद्यानात आता पक्षांचा किलबिलाट > एकेकाकी प्रतापसिंह उद्यानातील वाघ, सिंहांच्या डरकाळीने शहर धीरगंभीर व्हायचे, त्या ठिकाणी आता पक्षांचा किलबिलाट होणार आहे. या उद्यानात पक्षी संग्रहालय करण्यास जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला आहे. या निधीतून सध्याला कामाला सुरूवात झाली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 कोटी 60 लाखांचा विशेष निधी देखील मंजूर केला आहे.

SANGLI MAHAPALIKA : प्रतापसिंह उद्यानात आता पक्षांचा किलबिलाट

डीपीडीसच्या निधीतून काम सुरू: उपमुख्यमंत्र्यांचा विशेष निधी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या इमारतीला लागूनच श्रीमंत प्रतापसिंह महाराज पटवर्धन उद्यान आहे. हे उद्यान आमराईच्या खालोखाल प्रसिद्ध होते, या ठिकाणी सिंहांची संख्या अधिक होती. मात्र, ऐसपैस वातावरण नसणे आणि जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्तीमुळे सिंहांची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्यामुळे सिंहासह इथले प्राणी सारखेच आजारी पडायचे. शिवाय ‘सेंट्रल झू अ‍ॅथोरटी’च्या निकषांत हे बसत नसल्याने या ठिकाणचे प्राणी 2002 मध्ये बंगळूरला हलविल्यात आले होते. त्यानंतर प्रतापसिंह उद्यान रसातळाला गेले. हळूहळू जागाही कमी झाली. हिरवळ नाहीशी झाली. मधल्या काळात उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यातून काही हिरवळ व खेळणी बसविण्यात आली आहेत.

लहान मुलांना थोडासा टाईमपास मिळत आहे.

त्यामुळे खवैय्यांची गर्दी असल्याने थोडेशी गर्दी होत आहे. उंच झाडांशिवाय महापालिका इमारतीला लागून काही शोभेची झाडे वगळता उद्यानातील हिरवळ पूर्णत: नाहीशी झाली आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी 2021 मध्ये प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय करण्याचा निर्णय घेतला होता. पक्षीमित्र व तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रत्येक जातीच्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे पिंजरे तयार करण्यात येणार आहेत.

संग्रहालयासाठी पक्षिमित्रांची एक तज्ज्ञ समिती देखील गठित केली आहे.

हा प्रस्ताव अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड व सेंट्रल झू अ‍ॅथोरेटीकडे पाठविण्यात आला. त्यानुसार त्यांनी अटी व शर्तीनुसार महापालिकेला पक्षी संग्रहालय उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये देशी पक्षी असणारे कावळा, चिमणी आदी पक्ष्यांना मनाई केली आहे. पण बदक, राजहंस, कोंबड्यांचे विविध प्रकार, इमो यातून वगळले आहे. तर विदेशी पक्षांना परवानगी दिली आहे.

त्यानुसार पक्षी संग्रहालयाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी 1 कोटी 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून सध्या प्रतापसिंह उद्यानात काम सुरू झाले आहे. पिंजरा रिपेअरीसह इतर कामे देखील केली जात आहेत. पक्ष्यांसाठी पिंजरे, दवाखाना, फुड मॉल, सीसीटीव्ही कॅमेरे, पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर रूम देखील उपलब्ध असणार आहे.

पक्षी संग्रालयात वाघ, सिंह, हत्ती यांची प्रतिकृती व त्यांचे आवाज देखील ऐकायला मिळणार आहे.

हे काम चार महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका क्षेत्रातील कामांसाठी 50 कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालयासाठी 1 कोटी 60 लाख रूपये मंजूर केले आहेत. दुसर्‍या टप्प्यात या निधीतून काम करण्यात येणार आहे.

पक्षी संग्राहलय पूर पूट्ट्यात….

प्रतापसिंह उद्यान हे पूरपट्ट्यात येते. तशी मार्किंग देखील लावली गेली आहे. महापूूर आला की उद्यानात पाच ते सहा फुट पाणी येते. मग त्यावेळी काय होणार? असा सवाल देखील पक्षी मित्रांकडून उपस्थित केला जात आहे. प्रतापसिंह उद्यानातील वन्य प्राणी, विदेशी पक्षी इतर प्राणी संग्रहालयात स्थलांतर करण्यात आले होते. त्यावेळी मनपावर ठपका ठेवला गेला होता. आता परत या विदेशी पक्ष्यांचे हाल होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न पक्षीमित्रांनी उपस्थित केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज