jayant patil news : मी जातो आहे, पण सोडत नाही – जयंत पाटील

SHARE:

गेल्या सात वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणारे आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी बोलताना ते भावूक झाले होते. त्यांच्या भाषणाचा घेतलेला आढावा….

jayant patil news : मी जातो आहे, पण सोडत नाही – जयंत पाटील : एक पाऊल मागे पण हे केवळ अंतर मोजण्यापुरते. हे केवळ रणभूमीवरची एक तात्पुरती चाल. कारण रण अजून बाकी आहे. आणि उद्दिष्ट अजूनही तेच आहे – महाराष्ट्राच्या माणसांसाठी लढणे. कालही होतो, आजही आहे, उद्याही राहीन. नाव जरी झाकले गेले तरी काम झाकले जाणार नाही, कारण माझी ओळख माझ्या कामातच आहे. मी जयंत आहे!

jayant patil news : मी जातो आहे, पण सोडत नाही – जयंत पाटील

महाराष्ट्राच्या मातीतील एक सैनिक. सत्ता असो वा नसो, सिंहासन असो वा नसो – माझं नातं या मातीतल्या माणसांशी आहे. आज नवा नेता आला म्हणून जुनं निष्ठा हरवत नाही; कारण नवं नेतृत्वही त्या जुन्याच निष्ठेची, त्या जुन्याच रक्तातल्या तळमळीची बात घेऊन येतं.

मी मुख्य सेनापती होतो, हो पण ही सेना केवळ माझी नव्हती, ही सेना महाराष्ट्राच्या माणसांची होती. ती अजूनही सज्ज आहे. तलवारी अजूनही धारदार आहेत. मुठी अजूनही आवळलेल्या आहेत. कारण आमचा लढा सत्ता मिळवण्यासाठी नव्हता, तो न्यायासाठी होता.

नवा काळ येईल, नव्या दिशा दिसतील, नव्या पिढ्या उभ्या राहतील. पण त्या पिढ्यांचं रक्त शहाजीराजांच्या, शाहूंनी दिलेल्या शिकवणीचंच आहे. फुल्यांनी पेरलेले विचार आणि आंबेडकरांनी उभं केलेलं स्वाभिमान आजही आमच्या छातीत घोळतो.

माझं नाव जरी कुणाच्या पाटीवरून उतरलं, तरी माझं काम कोणाच्या स्मृतीतून उतरू शकत नाही. कारण ही माती ओळखते – कोण तिच्यासाठी झिजला, कोण तिच्यासाठी झुकला आणि कोण तिच्यासाठी उभा राहिला.

jayant-patil-news-i-am-leaving-but-i-am-not-leaving-jayant-patil

माझं पाऊल मागे गेलंय, पण माझं मन, माझी नजर, माझा विश्वास अजूनही पुढेच आहे. महाराष्ट्राचा आवाज अजूनही माझ्या आवाजात घुमतो आहे. मी जातो आहे पण सोडत नाही.

कारण मी जयंत आहे!

शेवटी एवढंच –
सत्ता हे साधन आहे, ध्येय नाही. माणूस, माती आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान राखणं हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. त्या ध्यासाला कुठलीही हार, कुठलाही अंधार पचवू शकत नाही.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *