pratik patil islampur news : राजारामबापू कारखान्याचा नांवलौकिक कायम ठेवण्यासाठी जे-जे कष्ट घ्यावे लागतील ते घेऊ : साखर उद्योगातील तीव्र स्पर्धा व येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा नांवलौकिक कायम ठेवण्यासाठी आम्हास जे-जे कष्ट घ्यावे लागतील,ते-ते आम्ही घेऊ,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला.
pratik patil islampur news : राजारामबापू कारखान्याचा नांवलौकिक कायम ठेवण्यासाठी जे-जे कष्ट घ्यावे लागतील ते घेऊ
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिट कार्यस्थळा वर गळीत हंगाम २०२५-२६ चे रोलर पूजन प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक देवराज पाटील,बाळासाहेब पवार,कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील,प्रदीपकुमार पाटील,अमरसिंह साळुंखे,डॉ.सौ.योजना शिंदे-पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,राज्य प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राष्ट्रीय साखर कामगार संघाचे कार्याध्यक्ष तानाजी खराडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या ५५ वर्षापासून यशस्वी वाटचाल करीत आहे. लोकनेते राजारामबापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे कष्ट आणि आपणा सर्वांच्या सहकार्याने ही वाटचाल सुरू आहे. भविष्यात ही यशस्वी वाटचाल कायम ठेवण्या साठी आम्ही जे-जे कष्ट घ्यावे लागतील,ते घेऊ.
pratik-patil-islampur-news-we-will-take-whatever-efforts-are-necessary-to-maintain-the-reputation-of-rajarambapu-factory
याप्रसंगी संचालक शैलेश पाटील,प्रताप पाटील,दादासो मोरे,रमेश हाके,रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,रामराव पाटील,वैभव वसंतराव रकटे,दिलीपराव देसाई,राजकुमार कांबळे,हणमंत माळी,कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख,विकास पवार,सचिव डी.एम. पाटील,विजयराव मोरे,सुनिल सावंत,प्रशांत पाटील,प्रेमनाथ कमलाकर,महेश पाटील, अनिलकुमार पाटील,डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक आर.डी. माहुली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











