rajkiyalive

SANGLI : सांगली महापालिकेत सातशे जागांची भरती

आकृतीबंदला मंजुरी: आता अंतिम मंजुरीची प्रतिक्षा

जनप्रवास । सांगली
SANGLI : सांगली महापालिकेत सातशे जागांची भरती : महापालिकेच्या वर्ग एक ते चार संवर्गातील सुमारे सातशे जागांच्या भरती प्रक्रियेला आता लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर गती येणार आहे. मार्च 2023 मध्ये मनपा कर्मचार्‍यांच्या आकृती बंदला मंजुरी मिळाली होती. तर आता भरती प्रक्रियेला अंतिम मंजुरी जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

SANGLI : सांगली महापालिकेत सातशे जागांची भरती

महापालिकेची स्थापना 1998 मध्ये झाली. त्यानंतर तत्कालिन आयुक्त मिलिंद म्हैसकर यांनी 2004 ला महापालिकेत भरती प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी दोन, तीन व चार संवर्गातील 300 जागा भरल्या होत्या. त्यानंतर मात्र 20 वर्षे महापालिकेत भरती प्रक्रिया झालेली नाही. 2019 मध्ये महापालिकेच्या कर्मचार्‍यांचे रोस्टर तपासणीसाठी मागासवर्गीय कक्ष पुणे व मुंबई येथे पाठविण्यात आले होते. 2023 मध्ये या रोस्टरला मंजुरी मिळाली. महापालिकेतील 255 कर्मचार्‍यांना सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती मिळाली. तर 950 नवीन पदांचा आकृतीबंध मंजूर झाला होता. पण महापालिकेचा अस्थापनेवर खर्च 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आकृतीबंधानुसार मंजुरी मिळालेल्या सर्व कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया राबविणे शक्य नाही.

आचारसंहितेच्या कचाट्यात मनपाची कर्मचारी भरती अडकली.

आरोग्य विभाग, ड्रेनेज विभाग, अग्निशमन विभागासह इतर अत्यावश्यक सेवेतील पदे प्राधान्याने भरावीत, अशा सूचना शासनाकडून आल्या होत्या. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकार्‍यांची भरती प्रक्रियेसाठी चार महिन्यापूर्वी पुणे मागासवर्गीय कक्ष पुणे व मुंबई कक्षाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्याप याला मंजुरी मिळाली नाही. दोन महिने प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. पण निवडणुकीचा काळ असल्याने भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली नाही. त्यानंतर मार्च महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहितेच्या कचाट्यात मनपाची कर्मचारी भरती अडकली.

जून महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने भरतीसाठी पावले उचलली जाणार आहेत.

आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 6 जूनला संपणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीतच भरती प्रक्रियेची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जून महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने भरतीसाठी पावले उचलली जाणार आहेत. शासनाकडून अंतिम मंजुरी घेऊन भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.

कंपनीमार्फत राबवली जाणार भरती प्रक्रिया…

राज्य शासनाने भरती प्रक्रियेसाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या विविध खात्यातील भरती प्रक्रिया याच कंपन्यांमार्फत राबवली जाते. यातील एका कंपनीमार्फत मनपाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परिक्षा घेऊन विविध पदांची भरती होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज