rajkiyalive

SANGLI MAHAVITRAN : जिल्ह्यात स्मार्ट-मीटरला विरोध

जनप्रवास । सांगली

SANGLI MAHAVITRAN : जिल्ह्यात स्मार्ट-मीटरला विरोध : महावितरणकडून राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यात देखील ही कार्यवाही सुरू होणार आहे. यापूर्वी काही राज्यात मीटर बसविले आहेत. त्या ठिकाणी दप्पट-तिप्पट बिले आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्मार्ट मीटरला विरोध करण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तर या विरोधात पहिल्या टप्प्यात सोमवार दि. 3 जुनला जिल्हाधिकारी व महावितरण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

SANGLI MAHAVITRAN : जिल्ह्यात स्मार्ट-मीटरला विरोध

प्रीपेड मीटरला विरोधासाठी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक येथील कष्टकर्‍यांची दौलत येथे गुरूवारी पार पडली. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे नेते प्रतापराव होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महावितरणकडून जिल्ह्यात लवकरच स्मार्ट मिटर बसवण्यात येणार आहेत. स्मार्ट मिटर फसवे आहे. यापूर्वी पाच राज्यात स्मार्ट मिटर बसवलेल्या ठिकाणी ग्राहकांना दुप्पट-तिपटीने बिले आली आहेत.

त्यात ही प्रीपेड मीटर योजना किती फसवी आहे,

त्यामध्ये हजारो कोटीचा घोटाळा होणार आहे. तसेच देशांमध्ये राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये पाच दहा टक्के ठिकाणी सदर प्रीपेड मीटर बसवली आहेत. त्या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे.

कारण मिटर जम्पिंग होणे तसेच दुप्पट, तीनपटीने बिले आल्याचे प्रकार घडत आहेत.

आपल्या राज्यात वीज ग्राहकांना या पद्धतीने त्रास होऊ नये, म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून हरकती गोळा करणे व टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवून सदर प्रीपेड योजना विरोध करण्याचा एकमताने ठरले. पहिला टप्पा म्हणून सोमवार दि. 3 रोजी दुपारी चार वाजता महावितरण मुख्यालय (विश्रामबाग) व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सतीश साखळकर, उमेश देशमुख, हनुमंत पवार, जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, नितीन चव्हाण, शंभूराज काटकर, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, लालू मिस्त्री, अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, गजानन साळुंखे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, कलगुंडे पाटील, विश्वजीत पाटील, सुरेश बिरादार, जावेद मोमीन, मुकुंद माळी, दत्ता पाटील, निलेश पवार, हरिदास पाटील, सचिन जगदाळे, नितीन मिरजकर, डॉ. विजय बचाटे, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज