rajkiyalive

sangli mahavitran news : आता वीजबिलात मिळणार 120 रुपयांची सवलत

गो-ग्रीन सेवेत नव वर्षाची महावितरणकडून भेट

sangli mahavitran news : आता वीजबिलात मिळणार 120 रुपयांची सवलत  : महावितरणकडून ’कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. नूतन वर्षांची भेट म्हणून गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तात्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. आता पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तात्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे.

sangli mahavitran news : आता वीजबिलात मिळणार 120 रुपयांची सवलत

गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडणार या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलद्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो-ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो-ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो-ग्रीन पर्याय निवडणार्‍या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे.

त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज