मुलगा नोकरीस असल्याने हितसंबंधात बाधा, जिल्हा उपनिबंधकांची कारवाई
जनप्रवास । सांगली
sangli market commiti : बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील यांचे संचालकपद रद्द : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितचे संचालक रामचंद्र हरी पाटील ( रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) यांचे संचालकपद पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिला. संचालक पाटील यांचा मुलगा विठ्ठल पाटील बाजार समितीमध्ये नोकरीस असल्यामुळे बाजार समितीच्या हितसबंधात बाधा येत असल्यामुळे कारवाई करण्यात आली. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक असून सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.
sangli market commiti : बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील यांचे संचालकपद रद्द
बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील यांच्या विरोधात आबासाहेब चंदर खांडेकर (रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) यांनी त्यांच्या संचालक निवडीला आवाहन दिले होते. त्यावर सहकार उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963, नियम 1967 व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नियमानुसार हा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी निकालापासून तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारदार खांडेकर यांच्यावतीने अॅड. पंडित सावंत, बाजार समितीतर्फे अॅड. अरविंद देशमुख, संचालक रामचंद्र पाटील यांच्यावतीने अॅड. एस. बी. ओलेकर यांनी तर त्यांचा मुलगा विठ्ठल यांच्यावतीने अॅड. ए. ए. पितांबरे यांनी काम पाहिले. जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजुचे म्हणणे व युक्तीवाद ऐकुन निष्कर्ष नोंदविले. यामध्ये जबाबदार रामचंद्र पाटील हे बाजार समितीचे निवडणूकीमध्ये कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय पिक कर्जवाटप संस्था शेतकरी मतदारसंघातून सर्वसाधारण प्रतिनिधी या गटातून निवडून आलेले संचालक आहेत. संचालक रामचंद्र पाटील व नोकरीस असलेला मुलगा विठ्ठल पाटील यांच्यामध्ये वडील मुलाचे नाते असल्याबाबत सर्व जाबदारांनी मान्य केले आहे.
बाजार समितीचे विठ्ठल पाटील हे कायमस्वरुपी नोकर आहेत. संचालक रामचंद्र पाटील यांचे रेशनकार्ड, जमीन, मिळकतीत त्यांचा मुलगा विठ्ठल पाटील यांचे नांव नसले तरी त्यांच्यातील वडील मुलाचे नाते नाकारण्यात आलेले नाही. त्यांच्यात जमीनीचे वाटप करुन घेतले व विभक्त रहात असलेमुळे वडील मुलाचे नाते संपुष्टात येत नाही. संचालक रामचंद्र पाटील यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे रोजगारात हितसंबंध निर्माण झाले आहेत. यामुळे महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963, नियम 1967 व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 मधील नियम क्रमांक 10 (3) मधील तरतूदीनुसार रामचंद्र पाटील हे सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी केली.
सत्ताधारी आघाडीला धक्का, मात्र परिणाम नाही
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. संचालक पदाच्या सर्वच पंधरा जागांवर आघाडीचे संचालक आहेत. काँग्रेसचे सात, राष्ट्रवादी 6 आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाचे दोन संचालकांचा समावेश आहे. घोरपडे गटाचे विकास सोसायटी रामचंद्र पाटील आणि ग्रामपंचायत गटातून बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील हे संचालक आहेत. यापैकी सोसायटी गटातील रामचंद्र पाटील यांचे संचालकपद रद्द झाले आहे, त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



