rajkiyalive

सांगली, मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी

पोलिसांना आलेल्या निनावी फोन मुळे यंत्रणेत खळबळ :अज्ञातांवर गुन्हा दाखल.

सांगली, मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी : सांगली : रात्री सांगली शहर पोलिस ठाण्यात फोन वाजला… ’रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ’, अशा धमकीच्या फोनने सारी यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, राखीव दलाचे पोलिस, अग्निशमन यंत्रणा यांना वायरलेसवरून कॉल देण्यात आला. अवघ्या काही मिनिटात सर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

सांगली, मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी

रेल्वे पोलिस ही सोबतीला होतेच. असून तपासणी सुरू झाली. तेवढ्यात शान पथक ही दाखल झाले. पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांमध्ये ही घबराट पसरली. या सार्‍यात यंत्रणा मात्र सतर्क आणि वेळेत घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांच्या अथक शोध मोहिमेनंतर कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही. यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या व्यक्तीचा शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

आम्ही आरडीएक्स बॉम्ब रेल्वे स्टेशन परिसरात ठेऊन सदरचे स्टेशन बॉम्बने उडवून देणार आहोत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने निनावी फोन करून तो दहशतवादी असून त्याच्या सोबत अन्य पाच व्यक्ती आहेत. आम्ही आरडीएक्स बॉम्ब रेल्वे स्टेशन परिसरात ठेऊन सदरचे स्टेशन बॉम्बने उडवून देणार आहोत. आमची माणसे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे याठिकाणी पोहोचली असून त्याठिकाणी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी दिली.

तातडीने पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी सदरच्या निनावी फोन बाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने मिरज रेल्वे जंक्शन आणि अपर अधीक्षक रितू खोकर यांनी सांगली रेल्वे स्थानकात धाव घेतली. काही मिनिटातच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट करण्यात आले. जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करत आपत्कालीन यंत्रणांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या. सांगली आणि मिरज रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली परंतु कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही. यानंतर धमकी देणार्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.

अचानक पोलिसांचा फौजफाटा दाखल होऊन तपासणी मोहीम सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान, रात्रीच्या वेळेस रेल्वे स्थानकावर परगावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. अशावेळी अचानक पोलिसांचा फौजफाटा दाखल होऊन तपासणी मोहीम सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, प्रणील गिल्डा, निरीक्षक सतीश शिंदे, ईश्वर ओमासे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल होता.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज