rajkiyalive

sangli murdar news : सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

sangli murdar news : सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून : विजयनगर परिसरात असलेल्या शाहूनगर मध्ये चारित्र्याच्या संशयावरून मध्यरात्री गाढ झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून पतीने निर्घृण खून केल्याची घटना घडली. आज गुरुवारी पाहटे चार वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली.शिलवंती पिंटू पाटील (वय 30, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

sangli murdar news : सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

लाकडी दांडक्याने केले डोक्यात वार : दोन मुलांना घेऊन पसार झालेल्या पती जेरबंद.

खुनानंतर संशयित पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला. संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या 12 तासात सोलापूर जिल्ह्यातील मंदरूप येथील सांसहित पिंटू पाटील याला ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संशयित पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षापासून तो सांगलीत राहतो. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होत. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतू सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते.

दोघांना दोन मुले आहेत. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते. शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती. तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता. काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत वाद होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला.

त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी पथकांसह धाव घेतली होती. संशयित पिंटू पाटील हा खुनानंतर दोन्ही मुलांना घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Brutal murder of wife on suspicion of character in Sangli

तो गावाकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे संजयनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक मंगळवेढा, सांगोला तालुक्याकडे रवाना झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पिंटूच्या मागावर होते. यावेळी पथकातील कर्मचार्‍यांना माहिती मिळाली कि, तो त्याच्या मूळगावी अंत्रोळी (ता. मंगळवेढा) याठिकाणी आहे. पथकाने तातडीने त्याठिकाणी सापळा रचूनसंशयित पिंटू पाटील याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, अतुल माने, सुशील मस्के, श्रीधर बागडी, अभिजित माळकर, सुमित सूर्यवंशी, सुशांत चिले यांच्या पथकाने केली.

घर सोडून बहिणीकडे गेली पुन्हा आली अन झाला घात…

पती आणि पत्नीमध्ये होणार्‍या वारंवार वादास कंटाळून शिलवंती दि. 13 जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली होती. शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते. त्यानंतर मध्यरात्री दोघांमध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून वादावादी सुरू झाली. दरम्यान, शिलावंती हि झोपल्यानंतर संशयित पिंटू याने लाकडी बांबूने मारहाण करून तिचा खून केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज