rajkiyalive

sangli murdar news : प्रेम संबंधातूनच काढला काटा : अनिकेत हिप्परकर खून प्रकरण : मुख्य सूत्रधारासह एकास अटक : सहा संशयितांपैकी चौघे अल्पवयीन.

सांगली:

sangli murdar news : प्रेम संबंधातूनच काढला काटा : अनिकेत हिप्परकर खून प्रकरण : मुख्य सूत्रधारासह एकास अटक : सहा संशयितांपैकी चौघे अल्पवयीन. : शहरातील जामवाडीतील मरगूबाई मंदिरानजीक पिग्मी एजंट म्हणून कार्यरत असणार्‍या अनिकेत हिप्परकर याचा मेहुणीशी असलेल्या प्रेम संबंधाच्या रागातून तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कोयत्याने वार करुन निघृर्ण खून केल्याचे आता तपासात स्पष्ट झाले आहे. खून करून पसार झालेल्या मुख्य सूत्रधारासह दोघांना पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. तसेच या खून प्रकरणात सहभागी असणार्‍या सहा जणांपैकी चौघा अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

sangli murdar news : प्रेम संबंधातूनच काढला काटा : अनिकेत हिप्परकर खून प्रकरण : मुख्य सूत्रधारासह एकास अटक : सहा संशयितांपैकी चौघे अल्पवयीन.

पोलिसांनी संशयित मंगेश उर्फ अवधूत संजय आरते (वय 27, रा. मरगूबाई मंदिरानजीक, जामवाडी, सांगली) आणि जय राजू कलाल (वय 18 वर्षे 5 महिने, रा. उदय मटण शॉपनजीक, पटेल चौक, जामवाडी, सांगली) या दोघांना अटक केली. तर चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले.

अनिकेत कब्बडीपट्टू असून यापूर्वी जिल्हा संघातून कब्बडी खेळला होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत अनिकेत हिप्परकर हा जामवाडीत आजी, आत्या व भावासोबत राहतो. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो महाविद्यालय शिकत होता. अनिकेत कब्बडीपट्टू असून यापूर्वी जिल्हा संघातून कब्बडी खेळला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा कब्बडी खेळणार्या मित्रांसोबत वाद झाला होता. या वादातून संशयित व अनिकेतमध्ये वारंवार खटके उडत होते.

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिकेत हा जीमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर चालत मरगुबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. त्याच्या डोक्यात पाच तर पाठीवर सहा वार करण्यात आले. डोक्यात आणि मानेत वार खोल गेल्याने दोन्ही कोयते अडकून पडले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोरांनी पलायन केले. भरवस्तीत खून झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भर वस्तीत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि पाच अल्पवयीन मुलांची नावे निष्पन्न झाली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास तातडीने नदीकाठ परिसरात धाव घेतली. हल्लेखोरांनी पोलिसांना पाहताच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करुन पोलिसांनी सर्वांना जेरबंद केले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर गोडे, उपनिरिक्षक केशव रणदिवे, महादेव पोवार आणि प्रमोद खाडे,पोलीस कर्मचारी विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदिप कुंभार, योगेश सटाले आदींचा समावेश होता.

प्रेमसंबंधावरून अल्पवयीन मुलांना हाताशी धरून काढला काटा…

संशयित मंगेश आरते यास, त्याच्या नात्यातील एका महिलेसमवेत मयत अनिकेत हिप्परकर याचे प्रेमसंबंध आहेत असा संशय होता. तसेच दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी संशयित मंगेश आरते याच्या वाढदिवसादिवशी मयत अनिकेत याच्यासमवेत मंगेश याचा वाद झाला होता. त्यामुळे मंगेश याने अनिकेत हिप्परकर याचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित मंगेश याने सहकार्याच्या सहाय्याने डाव साधून अनिकेत याचा गेम केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज