sangli news : चंद्रकांत पाटील सांगलीचे तर प्रकाश आबिटकर कोल्हापूरचे पालकमंत्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिला लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली. जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूरची पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
sangli news : चंद्रकांत पाटील सांगलीचे तर प्रकाश आबिटकर कोल्हापूरचे पालकमंत्री
उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.
या प्रमुख नेत्यांबरोबरच नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रिपद, वाशिमचं पालकमंत्रिपद हसन मुश्रिफ यांच्याकडे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. सांगलीचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरचं पालकमंत्रिपद गणेश नाईक यांच्याकडे आणि जळगावचं पालकमंत्रिपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.
डळसपर्-ीि षेी र्ेीी छशुीश्रशीींंशी:
एारळश्र Aववीशीी
ठशसळीींशी
राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे
– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
– एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
– अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
– चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
– राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
– हसन मुश्रिफ – वाशिम
– चंद्रकांत पाटील – सांगली
– गिरीश महाजन – नाशिक
– गणेश नाईक – पालघर
– गुलाबराव पाटील – जळगाव
– संजय राठोड – यवतमाळ
– आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
– उदय सामंत – रत्नागिरी
– जयकुमार रावल – धुळे
– पंकजा मुंडे – जालना
– अतुल सावे – नांदेड
– अशोक उईके – चंद्रपूर
– शंभुराज देसाई – सातारा
– अदिती तटकरे – रायगड
– शिवेंद्रराजे भोसले – लातूर
– माणिकराव कोकाटे – नंदूरबार
– जयकुमार गोरे – सोलापूर
– नरहरी झिरवळ – हिंगोली
– संजय सावकारे – भंडारा
– संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
– प्रताप सरनाईक – धाराशिव
– मकरंद जाधव – बुलढाणा
– नितेश राणे – सिंधुदुर्ग
– आकाश फुंडकर – अकोला
– बाबासाहेब पाटील – गोंदिया
– प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) – कोल्हापूर
– आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
– पंकज भोयर – वर्धा
– मेघना बोर्डीकर – परभणीहळश्रश-र-र301/

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



